Goa: नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या स्थापनेच्या 73 वर्धापन दिन साजरा

NCC चा भाग असण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि एनसीसीचे ब्रीदवाक्य कॅडेट्समध्ये रुजवणे, म्हणजेच एकता आणि शिस्त हा या उत्सवाचा उद्देश आणि हेतू होता.
कमांडिंग ऑफिसर कर्नल मनोज कुमार सिंह राठोड यांच्या हस्ते बॉईज आर्मी बटालियन सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कार स्वीकारताना
कमांडिंग ऑफिसर कर्नल मनोज कुमार सिंह राठोड यांच्या हस्ते बॉईज आर्मी बटालियन सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कार स्वीकारताना Dainik Gomantak

दाबोळी: नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या स्थापनेच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारतीय सशस्त्र दलाची (Armed Forces) युवा शाखा आणि जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना, एमईएस माजी-नॅशनल कॅडेट कॉर्प्स असोसिएशने नुकताच हा दिवस साजरा केला. MES कॉलेज बॉईज आर्मी बटालियन, गर्ल्स आर्मी बटालियन आणि नेव्ही बटालियनच्या उपस्थित कॅडेट्ससाठी एक कार्यक्रम आयोजित करून.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा बटालियन नॅशनल कॅडेट कॉर्प्स पणजीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनोज कुमार सिंह राठोड (Manoj Kumar Singh Rathore) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते NCC ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत माजी एएनओ मेजर जेम्स क्रिस्टोफर, माजी ANO इंगलहल्ली, एमईएस माजी एनसीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बांदेकर, उपाध्यक्ष प्रेमनाथ शेट्टी आणि सचिव मिस. बसमा याकुब आदी मान्यवर उपस्थित होते. नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या स्थापनेच्या 73 व्या वर्धापन शुभदिनी कॅडेट्सना उपस्थित मान्यवरांनी संबोधित केले.

कमांडिंग ऑफिसर कर्नल मनोज कुमार सिंह राठोड यांच्या हस्ते बॉईज आर्मी बटालियन सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कार स्वीकारताना
Goa: 35 हजार कोटी रुपयांची खनिज लूट वसूल करा

नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या स्थापनेच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त कॅडेट्ससाठी स्क्वॉड ड्रिल, बेस्ट कॅडेट, फोटोग्राफी, रांगोळी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. वास्को अग्निशमन केंद्राचे प्रभारी दिलीप बिचोलकर, 1975 च्या बॅचचे पहिले "ब" प्रमाणपत्र धारक श्री.शिरीष देसाई, , कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज गोवा शाखेचे अध्यक्ष श्री. अतुल जाधव,. एमईएस कॉलेजचे 1975 बॅचचे पहिले "C" प्रमाणपत्र धारक सब मेजर नरेंद्र दत्त आणि ज्योती रायजादा हे उपस्थित होते. सदर उपस्थित मान्यवरांनी, आयोजित विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

या प्रसंगी बॉईज आर्मी बटालियनमधील एसयूओ यश गावडे, गर्ल्स आर्मी बटालियनमधील एसयूओ स्नेहा यादव आणि नेव्ही बटालियनमधील पीओ कॅडेट फिजा तस्कीम यांना सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेचे एकूण विजेते आर्मी बॉईज बटालियन ठरले.

एनसीसीचा भाग असण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि एनसीसीचे ब्रीदवाक्य कॅडेट्समध्ये रुजवणे, म्हणजेच एकता आणि शिस्त हा या उत्सवाचा उद्देश आणि हेतू होता. एमईएस कॉलेज आणि एमईएस एक्स-एनसीसी असोसिएशन भविष्यातील पिढीला एनसीसीमध्ये सामील होण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमा मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com