Goa:‘भूमिपुत्र’ला संमती देऊ नका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यपालांना साकडे : उद्या निवेदन देणार
Goa Nationalist Party Press Confrence
Goa Nationalist Party Press ConfrenceDainik Goamantak

पणजी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (Goa) सोमवारी (Nationalist Party) राज्यपालांना निवेदन देऊन भूमिपुत्र विधेयकाला (Bhumiputra Bill) संमती न देण्याची मागणी करणार आहे. गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा (Jose Philip D soza) यांनी आज (शनिवारी) पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रवक्ते ॲड. अविनाश भोसले आणि सरचिटणीस संजय बर्डे उपस्थित होते. सरकारने अनेक वर्षे रखडलेल्या कूळ-मुंडकार केसेस पहिल्यांदा सोडवाव्यात. नंतर नवे विधेयक आणावे. त्या केसेस न सोडवता भूमिपुत्र विधेयक आणून लोकांना त्रासात टाकण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा आरोप डिसोझा यांनी केला. सरकारने राज्यपालांना विधेयक पाठवल्यानंतर त्यात बदल करण्याची घोषणा केली आहे. मात्र, विधेयकात बदल करण्यासाठी सरकारकडे खरेच वेळ आहे का? असा प्रश्‍न यावेळी डिसोझा (Jose Philip D soza)यांनी केला. नीज गोंयकारांची घरे नियमित करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र, मतांसाठी भूमिपुत्रांवर अन्याय नको. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवेदन राज्यपालांना दिले जाईल, त्यासोबत इतर पर्यायही अवलंबले जातील. भुमिपूत्र विधेयकाविरुध्द सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही डिसोझा यांनी केले. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने हे विधेयक आणले आहे.

Goa Nationalist Party Press Confrence
Goa Taxi: डिजिटल मीटरवरून टॅक्सीचालकांत फूट

गेली साडेचार वर्षे काही न करता फक्त मतांवर लक्ष ठेवून लोकशाहीविरोधी कारवाया सरकारने केल्या. खाणी व पर्यटन उद्योग भाजप सरकारमुळे संकटात आले. खाणी बंद केल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले. कोरोनामुळे (Corona) पर्यटन क्षेत्रावर विसंबून असलेल्यांना मोठा फटका बसला. तरीही भाजपचे नेते लोकांना फक्त खोटी आश्‍वासने देऊन वेळ मारून नेत आहेत, असा आरोप ॲड. भोसले यांनी यावेळी केला. कॉंग्रेस पक्षासोबत युती करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर अद्याप चर्चा झालेली नसली तरी ती होणार आहे. काही आमदार राष्ट्रवादीत येण्यास तयार आहेत. मात्र कॉंग्रेस अटी घालत असल्याने ते थांबले आहेत. सर्व निधर्मी पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव नक्की आहे. राष्ट्रवादीने २० जागा लढवून जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे जुझे डिसोझा (Jose Philip D soza) यावेळी म्हणाले.

Goa Nationalist Party Press Confrence
Goa Police: शिवोलीत साडेचार लाखाच्या गांजासह आरोपी गजाआड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com