Goa Naval Ship Repair Yard Recruitment: 173 पदांसाठी होणार भरती

Goa Naval Ship Repair Yard पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आहे.
Goa Naval Ship Repair Yard Recruitment: 173 पदांसाठी होणार भरती
Goa Naval Ship Repair Yard & Aircraft Yard recruitmentDainik Gomantak

नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार आणि नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड (Naval Ship Repair Yard & Aircraft Yard recruitment), गोवा विभागाने (Goa department) यांनी अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते apprenticeshipindia.gov.in या अप्रेंटिस ट्रेनिंगच्या अधिकृत साइटवरून अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 173 पदे भरण्यात येणार आहेत.

रिक्त जागांचा तपशील

नेव्हल शिप रिपेअर यार्ड,कारवार: 150 पदे

नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड, गोवा: 23 पदे

पात्रता निकष

नॅशनल/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेला असावा किंवा 65 टक्के गुणांच्या क्षमतेहसह 10 वी पास उमेदवारांचा विचार केला जाईल किंवा हेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. उमेदवाराची वयोमर्यादा 14 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील असावी.

निवड प्रक्रिया

10 वीच्या गुणपत्रिकेनुसार आणि आयटीआय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाईल. प्राथमिक गुणवत्ता यादीतील उमेदवारांना लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Goa Naval Ship Repair Yard & Aircraft Yard recruitment
Goa electricity department recruitment 2021: ITI उमेदवारांसाठी 334 पदांची भरती

असा करावा अर्ज

उमेदवारांनी भरलेला अर्ज 'प्रभारी अधिकाऱ्या'कडे पाठवावा लागेल. उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पुर्ण करून डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक- 581308 विभागाच्या या अधिकृत पत्यावर पाठवावा लागेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com