Goa: नौदलातर्फे INHS रक्तदान शिबिराचे आयोजन

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून (Goa Medical College) दात्यांना प्रशंसा प्रमाणपत्र (Certificate) देऊन गौरविण्यात आले.
Goa: नौदलातर्फे INHS रक्तदान शिबिराचे आयोजन
नौदल रुग्णालय INHS जीवन्ती येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना आशिष गोयल.सोबत इतर. Dainik Gomantak

दाबोळी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने वास्को-द-गामा येथील नौदल रुग्णालय INHS जीवन्तीत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याचे प्रभारी नौदल अधिकारी कमोडोर आशिष गोयल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

नौदल सप्ताह उपक्रमांचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या शिबिरात गोवा नौदल (Goa Navy) क्षेत्रातील नौदल कर्मचारी आणि संरक्षण नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग होता. शिबिरात एकूण 132 स्वयंसेवक सहभागी झाले असून 119 युनिट रक्त संकलित करण्यात आले.

नौदल रुग्णालय INHS जीवन्ती येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना आशिष गोयल.सोबत इतर.
Goa: तुळशी विवाह ही दुसरी मोठी दिवाळी

अशा प्रत्येक युनिटचा एकतर संपूर्ण रक्त म्हणून वापर केला जाऊ शकतो किंवा क्रायोप्रेसिपिटेट, प्लेटलेट्स इत्यादी घटक म्हणून एका वर्षापर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी संग्रहित केला जाऊ शकतो. दात्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून (Goa Medical College) प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com