एनसीईआरटीतर्फे अध्यापनाचे वेळापत्रक जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांसाठी ऑनलाईन शिक्षण कोणत्या पद्धतीने दिले जावे याचे मार्गदर्शन या वेळापत्रकातून करण्यात आले आहे.

पणजी: कोविड महामारीच्या काळात शाळा सुरू करणे शक्य होणार नसल्याने राष्ट्रीय शिक्षण व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटीने) पर्यायी वेळापत्रक तयार केले आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांसाठी ऑनलाईन शिक्षण कोणत्या पद्धतीने दिले जावे याचे मार्गदर्शन या वेळापत्रकातून करण्यात आले आहे.

सध्या ऑनलाईन वर्ग सुरू आहेत तरी वेळापत्रके प्रत्येक विद्यालयांनी आपापल्या सोयींनी तयार केली आहेत. ही वेळापत्रके एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. https://ncert.nic.in/alternative-academic-calendar.php या लिंकवर क्लिक करून हे वेळापत्रक पाहता येते. त्यात वर्गवार व विषयवार वेळापत्रक दिले आहे. विद्यार्थी घरी असताना त्यांना कोणत्या विषयासाठी कितीवेळ शिकवले जावे याचे मार्गदर्शन एनसीआरटीने या वेळापत्रकातून केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या