Goa Agriculture : 'गोव्याला रब्बी हंगामातील कृषी उत्पादन वाढवण्याची मोठी गरज'

रब्बी हंगामातील प्रामुख्याने तेलबिया, कडधान्ये आणि भाजीपाला पिकांकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी माहिती केंद्राच्या कृषी विस्तार विशेषज्ज्ञ डॉ. मोनिका सिंग यांनी दिली आहे.
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture : राज्याची तिन्ही हंगामातील कृषी उत्पादन क्षमता केवळ 117 टक्के आहे. ती वाढवण्यासाठी रब्बी हंगामातील प्रामुख्याने तेलबिया, कडधान्ये आणि भाजीपाला पिकांकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे.

कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने पीक व्यवस्थापन केल्यास भरघोस उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती केंद्राच्या कृषी विस्तार विशेषज्ज्ञ डॉ. मोनिका सिंग यांनी दिली आहे.

डॉ. सिंग म्हणाल्या, कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र यांच्यातील संशोधन, प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक पीक पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सातत्याने प्रयत्न करत आहे.

Goa Agriculture
Mahadayi River: घरोघरी लागणार पणत्या; म्हादईप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी अनोखा उपक्रम

शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनामध्ये वाढ करणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठीच आम्ही कृषी विस्तार योजनेअंतर्गत आदर्श कृषी उत्पादनाच्या पद्धती, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर साकारत आहोत.

डाळींचा तुटवडा

राज्य मुख्य अन्य निर्मिती म्हणजेच तांदळाच्या उत्पादनात सरप्लस असले तरी डाळी, कडधान्य, तेलबिया यांच्यासाठी इतर राज्यांवर व देशांवर अवलंबून आहे. याकरिता रब्बी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.

याशिवाय उन्हाळ्यामध्ये येणारी फळे प्रामुख्याने काजू, नारळ, फणस, आंबा, केळी, अननस यांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. तर कृषी उत्पादन क्षमता वाढेल.

Goa Agriculture
Goa Budget 2023: 'या' दिवशी सादर होणार गोव्याचा अर्थसंकल्प

25 टक्के भाजीपाला निर्मिती

राज्यात केवळ 25 टक्के भाजीपाला निर्मिती होते. तर 75 टक्के भाजीपाल्यासाठी शेजारील राज्यांवर निर्भर राहावे लागते. हे टाळण्याकरिता आणि स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांकडे वळले पाहिजे.

प्रामुख्याने हिरवा भाजीपाला, कडधान्ये, भुईमुगासारख्या तेलबियांचे उत्पादन घेतल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व राज्याच्या कृषी उत्पन्नावरही होईल, असेही डॉ. सिंग म्हणाल्या.

देशात तांदूळ, गहू, मका यासारख्या मुख्य अन्नधान्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ते सरप्लस आहे. मात्र, डाळी आणि तेलबिया यांच्यासाठी आपण इतर देशांवर निर्भर आहोत.

हे टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने कृषी मिशन राबविले जात असून तेलबिया आणि कडधान्ये उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकानंतर रब्बी हंगामातील उत्पादनावर लक्ष देणे गरजेचे आहे. - डॉ. मोनिका सिंग, कृषी विस्तार विशेषज्ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com