''गोव्यात लॉकडाउन करण्याची गरज"

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

गोव्यात कोरोना संसर्ग दररोज वाढत चालल आहे, यामुळे राज्यात लॉकडाउन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गोवा:  गोव्यात अर्थचक्रापेक्षा नागरिकांचे जीवन वाचविणे महत्वाचे आहे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी माहिती दिली. गोव्यात कोरोना संसर्ग दररोज वाढत चालल आहे, यामुळे राज्यात लॉकडाउन (Lockdown)  करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक उपाययोजना करून, गोव्याला नक्कीच पूर्ववत करणे आवश्यक आहे. राज्यातील कोरोना संसर्ग आणि मृत्यू दर सतत वाढत राहिले तर कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. (Goa needs to impose lockdown)

वळपई आठवडा बाजारात नागरिक विसरले सामाजिक अंतराचे  भान 

गोव्यात कोरोनाच्या संसर्गामूळे 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार चिंतेत आले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत तत्काळ बैठक बोलावण्यात आली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्या प्रमाणे गोव्यात लॉकडाउन करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. गोव्यात कोरोनामूळे 1055 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोव्यात आतापर्यंत 79 हजार 798 कोरोना रुग्ण आढळले असून आज दिवसभरात 2321 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. त्यामुळे राज्यात एकूण ऍक्टिव्ह (Active) कोरोना रुग्णाची  संख्या 15 हजार 260 झाली आहे.

सोमवारी मुख्यमंत्री सावंत यांनी आपत्कालीन बैठक बोलावली होती, तेव्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य मंत्री राणे यांनी राज्यात लॉकडाउन घोषित करण्यावर भर दिला आहे. अर्थचक्र सुरू राहणे महत्वाचे आहे तसेच लोकांचे जीवन देखील महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लग्न समारंभ असतील वा इतर ठिकाणी गर्दी दिसली की ते बंद पाडले जातील. आयोजकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी कठोर पावले टाकावी लागणार आहे. लोकाना ते अप्रिय वाटेल पण लॉकडाउन टाळण्यासाठी ते करावेच लागणार आहे. निर्बंधाचे पालन न केल्यास अंतिम पर्याय म्हणजे लॉकडाउन घोषित करावे लागणार आहे.

संबंधित बातम्या