गोवा: 21 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

यंदाचे शैक्षणिक वर्ष हे नववी व दहावीचे वर्ग वगळता इतरांसाठी ऑनलाईन होते. यापुढील शैक्षणिक वर्षात तरी वर्ग प्रत्यक्षात भरतील का?

पणजी: यंदाचे शैक्षणिक वर्ष हे नववी व दहावीचे वर्ग वगळता इतरांसाठी ऑनलाईन होते. यापुढील शैक्षणिक वर्षात तरी वर्ग प्रत्यक्षात भरतील का? याविषयी साशंकता असताना शिक्षण खात्याने 21 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, असे परिपत्रक जारी केले आहे.

शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र 21 जून ते 26 ऑक्टोबर असे असेल. 17 नोव्हेंबर ते 30 एप्रिल 2022 असे दुसरे सत्र असेल. 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर अशी गणेश चतुर्थीनिमित्त, तर 27 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर अशी दिवाळीची सुट्टी असेल. 24 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 अशी नाताळची सुट्टी असेल.

गोव्यातली टॅटूची दुनिया; जाणून घ्या कलंगुटमधील पाच फेमस टॅटू स्टुडिओ

पुढील वर्षी उन्हाळी सुट्टी 2 मे 2022 ते 4 जून 2022 अशी असेल. यंदाची उन्हाळी सुट्टी ही 19 मे ते 19 जून अशी असेल. कोणत्याही वर्गाचे निकाल 7 मे पूर्वी जाहीर करण्यात येणार नसल्याचेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅक्‍सींना डिजिटल मीटर; ‘बोले तैसा चाले’ 

संबंधित बातम्या