मडगावातील ‘कोविड’ इस्पितळ आजपासून सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जाहीर केल्यानुसार १९ सप्टेंबर रोजी हे कोविड इस्पितळ सुरू करण्‍यात येणार आहे, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. 

मडगाव: नवीन जिल्हा इस्पितळातील कोविड इस्पितळ १९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) डॉक्टरांच्या पथकाने आज पुन्हा एकदा कोविड इस्पितळात भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. 

डॉक्‍टरांच्‍या पथकाने आज पाहणी केली. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जाहीर केल्यानुसार १९ सप्टेंबर रोजी हे कोविड इस्पितळ सुरू करण्‍यात येणार आहे, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यात १५० खाटांसह हे इस्पितळ सुरू करण्यात येणार असून हळूहळू खाटांची क्षमता ३५० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. गोमेकॉच्या डॉ. सुनंदा आमोणकर व डॉ. राजेश पाटील या इस्पितळात नोडल वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतील. या इस्पितळात कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या