गोमंतकीयांना दिलासा; नवीन वाहतूक कायदा तूर्तास स्थगित

transport law.jpg
transport law.jpg

गोवा सरकारने सध्या निर्माण झालेल्या असलेल्या कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवीन मोटार वाहन कायदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कायद्यात नियम तोडताना वाहनचालकांवर मोठा दंड आकारला जाणार होता. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा कायदा सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. (In Goa, a new traffic law has been postponed)

राज्यात १ मे पासून नवीन वाहन कायदा लागू केला जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री मॉविन गोडीन्हो यांनी आठवड्याच्या सुरूवातीस केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारचा निर्णय वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर असून, कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने काही काळ हा निर्णय पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असेही सांगितले नवीन मोटार वाहन कायदा लागू  होण्याबाबतची माहिती पुढच्या काळात दिली जाईल. तसेच हा कायदा स्थगित केल्याची आम्ही केन्द्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला देखील देणार असल्याचे प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले. 

गोवा: अखेर सोपो कंत्राटदार आणि मासळी विक्रेत्यांमधील वाद मिटला
दरम्यान, गुरुवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष भाजपचे (BJP) अध्यक्ष सदानंद तणावडे (Sadanand Tanavade) यांनी, कोरोनायरसचा प्रसार झपाट्याने होत असल्याने लोक सध्या अडचणीत आहेत त्यामुळे नवीन नियम काही दिवस पुढे ढकलण्याचे आवाहन राज्य सरकारला केले होते. यानंतर नवीन कायदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com