साखळीत प्लास्टिक पिशवीत गुंडाळून नवजात अर्भकाला फेकले; रडण्‍यामुळे उलगडाला धक्कादायक प्रकार

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

वाळपई येथे कचरापेटीत पाच महिन्याचे मूल फेकून देण्याची घटना ताजी असतानाच, काल सोमवारी साखळी येथे  एक दिवसाचे नवजात अर्भक (मुलगी) उघड्यावर टाकून देण्याचा हृदयद्रावक प्रकार घडला.

डिचोली : वाळपई येथे कचरापेटीत पाच महिन्याचे मूल फेकून देण्याची घटना ताजी असतानाच, काल सोमवारी साखळी येथे  एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक उघड्यावर टाकून देण्याचा हृदयद्रावक तेवढाच संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने परीसरात खळबळ माजली असून, याप्रकरणी अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. 

रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची भाजप सरकार जबाबदारी घेणार का? दिगंबर कामतांचा सवाल 

साखळी सामाजिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूने प्लास्टिक पिशवीत गुंडाळून हे अर्भक टाकण्यात आले होते. या नवजात अर्भकाला उपचारार्थ बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्याची स्थिती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. हे अर्भक कोणी आणि कशासाठी टाकले, त्याबद्दल गूढ निर्माण झाले असले, तरी कोणीतरी अनैतिक संबंधातून जन्माला आल्यानंतर आपले कर्म लपविण्यासाठी हे कृत्य केले असावे, असा अंदाज आहे. तसा संशयही वर्तविण्यात येत आहे. 

काणकोण: शिक्षक अनंत सावंत यांचे निधन 

अर्भकाच्‍या रडण्‍याच्‍या आवाजाने प्रकार उघडकीस

साखळी आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूने कचरा टाकण्यासाठी आलेल्या स्थानिकांना त्या ठिकाणी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लागलीच यासंबंधी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि ‘त्या’ अर्भकाला ताब्यात घेऊन त्याला उपचारार्थ बांबोळी येथे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. डिचोली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
 

संबंधित बातम्या