Goa News: तब्बल 50 हजार वर्षांनंतर धूमकेतू अन् मंगळ एकत्र!

पृथ्‍वीवर परिणाम नाही : खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी पेडणेतून टिपला चित्तथरारक आविष्कार
Goa News|Comet And Mars
Goa News|Comet And MarsDainik gomantak

Goa News: खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी धूमकेतू आणि मंगळ यांच्या एकत्रीकरणाचा चित्तथरारक आविष्कार पेडणे कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयातून टिपला आहे. त्‍यासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक दुर्बिणीचा त्‍यांनी उपयोग केला.

सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी हा धूमकेतू दिसला होता. तो मंगळ ग्रहाजवळ आला तरी पृथ्वीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे तिळवी म्हणाले.

गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद, उच्च शिक्षण संचालनालय पर्वरी येथे संशोधन, विकास आणि नवोपक्रम केंद्रात डॉ. विठ्ठल तिळवी प्राध्यापक आहेत. धूमकेतूचे टोपण नाव सी/2023 असे ठेवण्यात आलेले आहे. गेल्‍या शनिवार दि. 11 रोजी हा धूमकेतू मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ होता. त्‍या रात्री हा ऐतिहासिक क्षण टिपण्याची संधी मिळाली.

Goa News|Comet And Mars
Goa Tourism: पर्यटन खात्यात ठाण मांडून बसलेल्या संचालकाची दमणला पाठवणी

नागरिकांसाठी नाईट स्काय शो

गोवा सरकारने संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालयात वाय-फाय सुविधा असलेली जी अत्याधुनिक दुर्बीण उपलब्ध करून दिलेली आहे, तिचा वापर करून हा दुर्मीळ क्षण टिपता आला. या दुर्बिणीचा वापर गोमंतकीयांसाठी करणार असून या माध्यमातून नाईट स्काय शो आयोजित करणार असल्याचे डॉ. तिळवी यांनी सांगितले.

जीवनातील आनंददायी अनुभव

धूमकेतू आणि मंगळ यांच्या एकत्रीकरणाची ही अत्यंत दुर्मीळ घटना टिपण्यासाठी200हून अधिक फोटो एकत्र जोडावे लागले. शनिवारी हा धूमकेतू मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ होता. जर, शनिवारची रात्र चुकली असती तर हा अनोखा क्षण टिपता आला नसता.

गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेऊन त्‍यासाठी तयारी करत होतो. हा अनुभव माझ्‍यासाठी खूप आनंददायी आहे, असे डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सांगितले.

Goa News|Comet And Mars
Mahadayi Water Dispute: '...यामुळे कर्नाटकला दिलेली डीपीआर मंजुरीच बेकायदेशीर अन् संशयास्पद'

संशोधनासाठी महागडी आणि खूप अत्याधुनिक साधने लागतात असे नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांतूनही आपण अवकाशीय संशोधन करू शकतो. गोवा सरकारने जी साधने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्‍यांचा अत्यंत आभारी आहे.- डॉ. विठ्ठल तिळवी, खगोलशास्त्रज्ञ, गोवा

असा आहे सी/2023 धूमकेतू

  • धूळ आणि खडकापासून बनलेला.

  • ताशी सुमारे 2 लाख किलोमीटर वेग.

  • आपल्यापासून 7,00,00,000 किलोमीटर दूर.

  • केवळ दुर्बिणीच्या माध्यमातून दिसू शकतो.

  • रंग आहे हिरवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com