गाडेधारकांनी घातली आजपासून उपोषणाला साद..!

सरकारने आश्‍वासन देऊनही पुनर्वसनाकडे दुर्लक्ष..
गाडेधारकांनी घातली आजपासून उपोषणाला साद..!
Goa News : फळ-भाजी विक्रेते Dainik Gomantak

पणजी Goa News : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) इस्पितळाच्या आवारात फळ-भाजी विक्रेते व गाडेधारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देऊन त्याची कार्यवाही होत नसल्याने आज पासून सोमवारी नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या गाडेधारकांनी दिली.

Goa News : फळ-भाजी विक्रेते
पाळी प्रकल्पासाठी ३ कोटीची तरतूद..!

यावर्षीच्या 1 जुलैला सरकारने गोमेकॉ इस्पितळाच्या बाहेर असलेले फळ-भाजी विक्रेते व गाळेधारकाना तेथून हटवून पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्‍वासन या गाडेधारक तसेच आमदार टोनी फर्नांडिस यांना दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने व दिलेले आश्‍वासन पाळत नसल्याने त्याच्या निषेधार्थ या गाडेधारकांनी ऑक्टोबर महिन्यात धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी स्थानिक आमदार फर्नांडिस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या या पुनर्वसनाचा प्रश्‍न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेऊन व पुनर्वसनाचा आराखडाही तयार करून घेतला होता. मात्र दिनदयाळ स्वास्थ्य योजनेखालील त्या पाच गाडेधारकांना उच्च न्यायालयाने जागा देण्याचे आदेश देऊन दोघांमधील अंतर पाच मीटर ठेवण्याची अट घातल्याने हा आराखडा पूर्णपणे बिघडला.

Goa News : फळ-भाजी विक्रेते
महामार्ग पार करणे ठरतेय धोकादायक

त्यानंतर पुन्हा नव्याने आराखडा तयार करण्यात येत असल्याचे व १० नोव्हेंबरपर्यंत बांधकाम सुरू होईल असे आश्‍वासन आमदार फर्नांडिस यांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. पुन्हा जर आंदोलन करावे लागले तर आपणही त्यामध्ये सहभागी होण्याचे आश्‍वासन या गाडेधारकांना फर्नांडिस यांनी दिले होते.

सरकारने दिलेल्या आश्‍वासनानुसार 10 नोव्हेंबरपर्यंत बांधकाम सुरू झाले नाही, तसेच आराखडाही तयार झाला नाही. त्यामुळे आमदार टोनी फर्नांडिस यांनी काही गाडेधारकांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सहा महिने उलटून गेले तर गाडेधारक बेरोजगार आहेत व त्यांना उदारनिर्वाहाचा काहीच पर्याय नसल्याने लवकरच पुनर्वसन करण्याची विनंती करण्यात आली.

सरकारचे दुर्लक्ष

मुख्यमंत्र्यांनीही साखळी उपोषण सुरू करू नका. आठवडाभरात हे बांधकाम सुरू करण्याचे निर्देश बांधकाम खात्याला देतो, असे आश्‍वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्यात आले होते. परंतु आश्‍वासनाकडे दुर्लक्ष झाले. त्याबाबत काहीच हालचाली सुरू होत नसल्याने साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनासिओ डॉमनिक परेरा यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com