कोमुनिदाद जमीनविक्रीत कोट्यवधींचा घोळ?

कार्लुस आल्‍मेदा : दाजी साळकर यांची महसूल विभागाकडून चौकशी सुरू
कोमुनिदाद जमीनविक्रीत कोट्यवधींचा घोळ?
Goa News कोमुनिदाद जमीनविक्रीत कोट्यवधींचा घोळ? Dainik Gomantak

दाबोळी Goa News : वास्को - खारीवाडा येथील कोमुनिदाद जमीन परस्पर विकल्याप्रकरणी मुरगाव नगरपालिकेचे वास्को शहर प्रभागाचे माजी नगरसेवक दाजी साळकर यांच्या विरोधात राज्य महसूल विभागात तक्रार दाखल केल्याची माहिती आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली. महसूल विभागामार्फत कमी दरात जमीन विकल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Goa News कोमुनिदाद जमीनविक्रीत कोट्यवधींचा घोळ?
इंडोको रेमेडीज कंपनीच्या महसुलात 43 टक्के वाढ

वास्को - खारीवाडा मुरगाव नगरपालिकेतील प्रभाग चौदामधील कोमुनिदादची जमीन माजी नगरसेवक दाजी साळकर यांनी गैरमार्गाने दिल्ली येथील इमारत बांधकाम करणाऱ्या उद्योगपतीला विकल्याची माहिती गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली होती. सदर कोमुनिदाद जमीन विकून कथित भ्रष्टाचार केल्याचा दावा सोनुर्लेकर यांनी करून याप्रकरणी दाजी साळकर यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली होती. कोमुनिदाद जमीन साळकर यांना देखरेखीसाठी दिली असता, त्‍यांनी ती परस्पर विकल्याने यात मोठ्या प्रमाणात कथित भ्रष्टाचार झाल्याची माहिती पत्रकार परिषदेतून परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली.

जमिनीची अत्‍यल्‍प दरात विक्री

वास्को - खारीवाडा येथील साळकर यांनी कमी दरात जमीन विकून भ्रष्टाचार केल्याची माहिती यापूर्वी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली होती. जमीन परस्पर विकल्याप्रकरणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दाजी साळकर यांच्या विरोधात राज्य महसूल विभागात तक्रार दाखल केली आहे. राज्य महसूल विभागाने सदर तक्रारीची दखल घेऊन कमी दरात जमीन विकल्‍याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती आमदार आल्मेदा यांनी दिली. जमीन विकताना साळकर यांनी कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा केला आहे. त्‍यांच्‍या विरोधात इतर विभागसुद्धा तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आमदार आल्मेदा यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com