डॉ. प्रमोद सावंत यांच्या यजमानपदाखाली महाअभिषेक संपन्न..
Goa News : जुने - म्हार्दोळ वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय येथे CM सावंत यांची उपस्थिती Dainik Gomantak

डॉ. प्रमोद सावंत यांच्या यजमानपदाखाली महाअभिषेक संपन्न..

जुने - म्हार्दोळ वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय येथे CM सावंत यांची उपस्थिती ..

दाबोळी Goa News: जुने - म्हार्दोळ वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय व आनुषंगिक पंचायतनात आज (दि.21) रोजी नौकाविहार (सांगोड) व दिपोत्सव वर्ष पद्धतीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षपद्धतीप्रमाणे नौकाविहार (सांगोड) व दीपोत्सवा प्रित्यर्थ सकाळी महाअभिषेक गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या यजमानपदाखाली संपन्न झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सौ. सुलक्षणा सावंत यांच्या यजमानपदाखाली विविध धार्मिक विधी पार पडल्या. नंतर दुपारी 12:30 वाजता मंगलारती झाली.

Goa News : जुने - म्हार्दोळ वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय येथे CM सावंत यांची उपस्थिती
शिवोलीची आयोजित ग्रामसभा ऐनवेळी रद्द झाल्याने ग्रांमस्थ आक्रमक!

दरम्यान संध्याकाळच्या सत्रात श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक तळीवर प्रयाण झाले व नौकाविहार झाला. यावेळी देवस्थान समितीतर्फे केलेल्या आवाहनाप्रमाणे भक्तगणांनी एकारती, तेल, वाती, कापूर, काडेपेटी व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आले होते. त्यामुळे श्रींच्या नौकाविहार समयी प्रत्येक भक्तगण आले होते. यामुळे प्रत्यक्षात देवीला आरती करण्याची संधी लाभली. यावेळी तळीभोती, तळी परिसरात व देवालयाच्या आवारात भक्तगणा कडून हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्कार भारती प्रेरणातर्फे आकर्षक रंगीबेरंगी भव्य रांगोळी साकारण्यात आली होती.

दरम्यान नौकाविहार आटोपल्यानंतर श्रींच्या पालखीचे देवालयात पुनरागमन झाले. तद्नंतर महाआरती, सामूहिक प्रार्थना, पावणी तीर्थप्रसादाने संपूर्ण दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com