'मराठी साहित्य संमेलन' आजपासून होणार सुरू..!

दोन दिवस साहित्याचा जागर संत सोहिरोबानाथ आंबिये नगर वळपे येथे होणार आहे.
Goa News  साहित्य संमेलन विषयी माहिती देताना कार्यध्यक्ष राजमोहन शेट्ये, चंद्रकांत सांगळे व पत्रकार उमेश गाड, भगवती देवीचे आशीर्वाद घेताना
Goa News साहित्य संमेलन विषयी माहिती देताना कार्यध्यक्ष राजमोहन शेट्ये, चंद्रकांत सांगळे व पत्रकार उमेश गाड, भगवती देवीचे आशीर्वाद घेतानाDainik Gomantak

मोरजी (Goa News): एका तपानंतर गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे 28 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरु होणार आहे. दोन दिवस साहित्याचा जागर संत सोहिरोबानाथ आंबिये नगर वळपे येथे होणार आहे. हे संमेलन एका तपानंतर तेही पेडणे तालुक्यात मराठी प्रेमींच्या बालेकिल्ल्यात होत आहे. ते संमेलन यशस्वी व्हावे आणि या सरस्वतीच्या सेवेला पेडणेच्या श्री भगवती देवीचा आशीर्वाद मिळून ते यशस्वी व्हावे, यासाठी 26 रोजी कार्याध्यक्ष राजमोहन शेट्ये, पत्रकार उमेश गाड व चंद्रकांत सांगळे यांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून आशीर्वाद घेतले.

Goa News  साहित्य संमेलन विषयी माहिती देताना कार्यध्यक्ष राजमोहन शेट्ये, चंद्रकांत सांगळे व पत्रकार उमेश गाड, भगवती देवीचे आशीर्वाद घेताना
परवानगीविना शाळा सुरू कराल तर होणार कारवाई!

यावेळी राजमोहन शेट्ये म्हणाले, की 20 वर्षानंतर पेडणेत आणि 12 वर्षानंतर गोव्यात साहित्य सेवक मंडळाचे संमेलन होत आहे. तपा नंतरचे हे संमेलन महत्वाचे आहे, देवीचा आशीर्वाद घेतला गेला. मराठीची वाटचाल पुढे नेण्यासाठी आणि मराठीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि दरवर्षी हे संमेलन व्हावे असे सांगून सर्वांनी यात साहित्यिक आणि साहित्य प्रेमींनी सहभाग दाखवावा असे आवाहन केले. मराठीसाठी आंदोलनापेक्षा मराठीची वेगळ्या पद्धतीने चळवळ उभारून आणि जागृती करून मराठीला तिला तिच्या हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी हा व्यापक उपक्रम असल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत सांगळे म्हणाले या संमेलनात खास पुस्तकांचे दालन चीत्रकारांचे प्रदर्शन होणार आहे हि एक पर्वणी आहे असे ते म्हणाले.

उमेश गाड म्हणाले, हे संमेलन ही एक पर्वणी आहे गेल्या वीस वर्षापूर्वी श्री भगवती मंदिर प्रांगणात हे संमेलन भरवले होते. आता पुन्हा 20 वर्षानंतर संत सोहिरोबानाथ अंबिये महाविद्यालयातील सभागृहात होत आहे. हा मराठीचा एक जागर असून मराठी प्रेमीना एक पर्वणी ठरणार आहे ते यशस्वी करण्याचे आवाहन उमेश गाड यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com