देवस्थान मंदिराचे नंबर परस्पर बिगर गोमंतकीय हॉटेल मालकांकडे सुपूर्त.!

मोरजी ग्राम सभेत प्रश्नांची सलबत्ती..
देवस्थान मंदिराचे नंबर परस्पर बिगर गोमंतकीय  हॉटेल मालकांकडे सुपूर्त.!
Goa News : मोरजी ग्राम सभेत प्रश्न विचारताना नागरिकसरपंच वैशाली शेटगावकर उत्तरे देताना [ छाया निवृत्ती शिरोडकर ]Dainik Gomantak

मोरजी Goa News: कोरोना काळाच्या महामारीनंतर प्रथमच मोरजी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्राम सभेत मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या बाजूला बेकायदा जे फलक आहे त्याच्याकडून जर महसूल मिळत नसेल तर ते फलक हटवावे, तेम्बवाडा किनारी भागातील सरकारी जागेत जी खारवी समाजाची स्मशानभूमी आहे त्याना त्यांच्या समाजासाठी 400 ते 500 चौरस मीटर जागा सोडून त्यांच्या बाजूला गावासाठी सार्वजनिक स्मशानभूमी उभारावी अशी मागणी करण्यात आली. शिवाय देवस्थान मंदिराचे नंबर परस्पर बिगर गोमंतकीय हॉटेल मालकांना कसे देण्यात आले याविषयावर बरीच गरमा गरम चर्चा झाली.

Goa News : मोरजी ग्राम सभेत प्रश्न विचारताना नागरिकसरपंच वैशाली शेटगावकर उत्तरे देताना
 [ छाया निवृत्ती शिरोडकर ]
‘गोंयचो आवाज’चे आवाहन; केजरीवालांनी टॅक्सीचालकांना फसवू नये!

मोरजी ग्रामसभा 21 रोजी सरपंच वैशाली शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच अमित शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, पवन मोरजे, विलास मोरजे, प्रकाश शिरोडकर, संपदा शेटगावकर, सुप्रिया पोके, तुषार शेटगावकर ,सचिव श्री धारगळकर, गट विकास अधिकारी प्रतिनिधी श्री नाईक आदी उपस्थित होते.

सुरुवातीला सरपंच वैशाली शेटगावकर यांनी स्वागत केले. पंचायत सचिव श्री धारगळकर यांनी मागच्या सभेचा ईतीवृतांत वाचून कायम केला.

आजच्या या सभेला एकमेव ग्रामस्थ तुकाराम शेटगावकर यांनी सात प्रश्न लेखी स्वरूपात सादर केले होते, या व्यतिरिक्त कुणीही प्रश्न लेखी दिले नाही.शिवाय दोन महिला सभेला उपस्तीत होत्या. ग्रामसभा तासभरात संपेल अशे वातावरण सुरुवातीला होते हातावर मोजता येणारे ग्रामस्थ सुरुवातीला होते, नंतर मात्र हळू हळू ग्रामस्थांची संख्या वाढू लागली. सभा साडे बारा वाजता संपली.

ऐनवेळी येणाऱ्या विषयावरून मध्यंतरी काळात सभा बरीच वादळी ठरली या सभेला आरजी कार्यकर्त्ये उपस्थित होते त्यांनी अधूनमधून प्रश्न उपस्थित करून सरपंचाना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला त्यावळी काही पंच ग्रामस्थ पंचायत मंडळाच्या मदतीला धावून आले. अगोदर लेखी प्रश्नांची उत्तरे द्यावी व ऐनवेळी आलेले विषय सरपंच यांच्या परवानगीने चर्चेला यावेत अशी जोरदार मागणी झाली.

जाहिरात फलक

ग्रामस्थ तुकाराम शेटगावकर यांनी आपल्या लेखी दिलेल्या प्रश्न गावात किती जाहिरात फलक आहेत आणि त्यातून पंचायतीला किती महसूल मिळतो असा प्रश्न होता त्यावर सरपंच वैशाली शेटगावकर यांनी उत्तर देताना कोणतीच पंचायतीकडे नोंद नाही, किंवा कुणालाच परवानगी दिलेली नाही. ते फलक सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाच्या जागेत असल्याने त्यांच्यावर संबधित खात्याने कारवाई करावी असे सुचवले असता विश्वनाथ आजगावकर निवृत्ती शिरोडकर, सुभाष शेटगावकर, शिवनाथ शेटगावकर आदींनी याविषयी चर्चेत भाग घेतला, फलक पंचायतीच्या हद्दीत येत असल्याने पंचायतीला महसूल मिळत नसेल तर ते फलक हटवावेत शिवाय कोणतेच बेकायदा फलक ठेवू नये आता निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय नेते आपल्या फलक लावून अतिक्रमण करत आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गावात जी गार्बेच कलेक्शन होते त्यातून किती फायदा होतो यावर सरपंच यांनी किमान वर्षाला सात ते आठ लाख रुपये नुकसान होते केवळ गाव स्वच्ह राहावा म्हणून हि मोहीम राबवली जाते. त्यावर ग्रामस्थांनी चर्चा केली, निवृत्ती शिरोडकर यांनी सरकार कचरा गोळा करण्यास काहीच निधी देत नाही का असा प्रश्न केला असता उपसरपंच अमित शेटगावकर यांनी सरकारने निधी देणार असे सांगितले होते परंतु अजून मिळाला नसल्याचे सांगितले. गार्बेज समितिचि वेळोवेळी बैठका का होत नाही असा प्रश्न तुकाराम शेटगावकर यांनी उपस्थित केला असता सरपंच वैशाली शेटगावकर यांनी कोरोना काळात बैठका झाल्या नाहित आणि बोलावली तर एक दोन सदस्य उपस्थित असतात या पुढे नियमित बैठका घेण्याचे आश्वासन दिले, आणि एखादा जर सदस्य तीन बैठकाना उपस्थित राहिला नाही तर त्याला कमी करून त्याच्या जागी दुसरा सदस्य घ्यावा अशी सुचना ग्रामस्थांनी केली.

Goa News : मोरजी ग्राम सभेत प्रश्न विचारताना नागरिकसरपंच वैशाली शेटगावकर उत्तरे देताना
 [ छाया निवृत्ती शिरोडकर ]
मडगाव रवींद्र भवन संस्थेला अपेक्षित अनुदान मिळणार; सगुण वेळीप

मंदिरांचे नंबर हॉटेल व्यावासायीकाना कसे ? यावेळी जागृत युवकांनी दोन देवस्थानचे मूळ नंबर बिगर गोमतकीय हॉटेल व्यावसायीकाना कसे काय दिले असा सवाल केला असता यावर बरीच गरमा गरम चर्चा झाली, सरपंच वैशाली शेटगावकर यांनी सांगितले कि हा विषयी ज्या काळात घडला त्या काळात तेव्हा आपण सरपंच नव्हते असा खुलासा केला. तुकाराम शेटगावकर यांनी विविध प्रश्न लेखी विचारले त्याला समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून तुकाराम शेटगावकर यांचे समाधान न झाल्याने मोरजी पंचायत गरीब आणि पंच मंडळी श्रीमंत कशी असा प्रश्न उपस्थित केला सरपंचांसहित पंच मंडळी त्यांच्यावर भडकले. पत्रकार सोडून कुणीच चित्रीकरण करू नये. या सभेत काही युवक आपापल्या मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होते त्याला सरपंच काही पंच व ग्रामस्थांनी हरकत घेतली. सरपंच ग्रामस्थांनी सांगितले कि आमचा स्थानिक पत्रकार निवृत्ती शिरोडकर आहे तोच चित्रीकरण करू शकतो, इतरांनी करायचे असेल तर पूर्व परवानगी घ्यावी , काहीजण नको असलेले चित्रीकरण करून गावाची बदनामी सामाजिक माध्यमातून करत आहे पत्रकाराशिवाय कुणीही चित्रीकरण करू नये अशी सुचना सरपंच वैशाली शेटगावकर यांनी केली. सार्वजनिक स्मशान भूमी विषयी बरीच चर्चा झाली त्यावेळी अमित मोरजे यांनी जी टेंबवाडा मोरजी येथी एका समाजाची सार्वजनिक स्मशान भूमी आहे त्याला आम्ही सरकारकडून एकही पैसा खर्च केला नाही ती स्मशानभूमी आमची आहे गावात अश्या कितितरी स्मशान भूमी आहेत त्याला सरकारचा पैसा खर्च केला आहे तर मग त्या सार्वजनिक ठरत नाही का असा सवाल उपस्थित केला. यावर बरीच चर्चा झाली. काही पंचायत कर्मचाऱ्यांना मेमो देण्यात आले, त्यावर चर्चा झाली, स्वयं मित्र कधी असतो, पंचायत कार्यालयीन वेळ किती असा प्रश्न विचारण्यात आला तश्या प्रकारचा बाहेर फलक लावावा, पार्किंग विषयावर बरीच गरमा गरम चर्चा झाली, खिंड ते न्यूवाडा पर्यंतच्या रस्त्याची जी सफेद लाईन आहे त्याच्या आता वाहने पार्क करू नये नो पार्किंग झोन करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी वविध विषयावर चर्चा झाली, घरपट्टी विषयी खासग्राम सभा आयोजित करण्याचे ठरले. दादी शेटगावकर, गजा शेटगावकर, श्री, बागकर, श्री सावंत, तुकाराम शेटगावकर, लक्ष्मिकान्त शेटगावकर, विश्वनाथ आजगावकर, सुभाष शेटगावकर, अमित मोरजे, कुमारी शेटगावकर आदी युवकांनी प्रश्न उपस्थित करून चर्चेत भाग घेतला. मुकेश गडेकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com