टिप्पर ट्रकच्या बॅटरी चोरट्यांना अटक..!

सुमारे पाच लाख रुपयांच्या 17 चोरीच्या बॅटरी जप्त केल्या आहेत.
 टिप्पर ट्रकच्या बॅटरी चोरट्यांना अटक..!
Goa News : Tipper Truck Battery Thieves Arrested Dainik Gomantak

सासष्टी Goa News : टिप्पर ट्रकच्या (Tipper truck) बॅटरी चोरी (thieves) केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी आज (शुक्रवारी) कारवाई करून किरण ऐवले (32, निपाणी) आणि झरीना बदामी (30, धारवाड) यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांच्या सुमारे 17 चोरीच्या बॅटरी जप्त केल्या आहेत. संशयिताजवळ अजूनही बॅटऱ्या असाव्यात असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस त्याअनुषंगाने तपास करत आहे. Goa News : battery thieves arrested

Goa News : Tipper Truck Battery Thieves Arrested
चोर्ला घाटातून अवजड वाहतुकीला परवानगी..!

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घोगळ येथील साईबाबा मंदिर परिसरात उभी केलेल्या टिप्पर ट्रकाची बॅटरी लंपास केल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय नाईक (54 , घोगळ) हे तक्रारदार आहे. पोलिसांनी आज फातोर्डा परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या अडवून चौकशी केली असता, या संशयित पुरुष व महिलेच या चोरीमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना त्यांनी चोरी केल्याचे कबुल केल्यावर त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून 17 बॅटरी जप्त केल्या. फातोर्डा पोलिसांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com