गोवा नाईटलाईफबाबत मंत्र्याचे सूचक विधान

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 जून 2021

भारतातील कोरोनाची(Covid-19) परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत गोव्यातील नाईटलाइफ(Goa night life) पुन्हा सुरू होऊ देणार नाही, असे भाजप नेते आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो(Michael Lobo) यांनी सांगितले.

पणजी: भारतातील कोरोनाची(Covid-19) परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत गोव्यातील नाईटलाइफ(Goa night life) पुन्हा सुरू होऊ देणार नाही, असे भाजप नेते आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो(Michael Lobo) यांनी सांगितले. त्यांनी सोमवारी लोकांच्या जीवनाचे रक्षण जास्त महत्वाचे आहे असं म्हणत गोव्यातील स्थानिकांच्या आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्यावर भर दिला आहे. (Goa nightlife should start only after the corona situation improves)

लोबो हे उत्तर गोवा जिल्ह्यातील  कळंगूट असेंब्ली सेगमेंटचे प्रतिनिधित्व करतात ज्यामध्ये बरेच नाईटक्लब आणि बार आहेत. पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले की, "साथीच्या आजाराने ग्रस्त अर्थव्यवस्थेला सामान्य स्थितीत परत येण्यास अजून एक वर्ष लागेल." गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अबलंबून आहे. गोवा राज्य नाइट लाइफ साठी खूप प्रसिद्ध आहे. नुसतं प्रसिध्दच नाही तर जगप्रसिद्ध अशी गोव्याची नाइट लाइफ आहे.

आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर मंत्री मायकल लोबो यांचा सरकारला घरचा आहेर 

"कोविड -19 च्या वाढत्या आकडेवारीमुळे नाइटलाइफ बंद करण्यात आली आहे आणि मला वाटते की देशातील कोविड -19 ची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत गोव्यातील ही नाइट लाइफ बंदच राहिली पाहिजे. त्याचबरोबर गोव्याच्या अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांचे जीवन अधिक महत्त्वाचे असल्याचे," लोबो म्हणाले.

COVID-19 मुळे आपल्या जवळचे मित्र मरत असल्याचे आपण पाहिले आहे. आम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शासन आणि प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करणे गरजेच आहे. कोरोनाचा प्रसार संपूर्ण भारतात नियंत्रणात येत असल्याचे समजल्यानंतर आर्थिक हालचाली पुन्हा सुरू होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

गोव्यातील धक्कादायक प्रकार! 67 जणांच्या मृत्यूची माहिती 9 महिन्यांनंतर झाली उघड

त्याचबरोबर लोबो यांनी पर्यटन टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाला चालना देणार नाहीत अशा कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा  गोव्यातील  हॉटेल पुन्हा उघडले जाईल तेव्हा पर्यटकांना कोरोनाचे नकारात्मक प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. आणि सर्व प्रोटोकॉल पाळले जाणे पण गरजेचं असणार आहे. गोव्यातील सध्याची कोरोना साथीची परिस्थिती सुधारतांना दिसत आहे जी मागील महिन्यात बिकट झाली होती. मागिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू  होणाऱ्यांची संख्या दररोजच्या चार्टमध्ये दिसून येत होती. तेव्हा आणि आजही बरेच लोक व्हेंटिलेटरवर आहेत.

संबंधित बातम्या