सरपंच किशोर देसाई यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

पंच सदस्यांच्या बैठकीला सातपैकी चार पंच  सदस्य उपस्थित राहिल्याने सरपंच किशोर देसाई यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव चार विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आला. 

कुडचडे: काले ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर देसाई यांच्या विरोधात सातपैकी चार पंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस १५ सप्टेंबर रोजी दाखल केली होती. त्याविरुद्ध चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या पंच सदस्यांच्या बैठकीला सातपैकी चार पंच  सदस्य उपस्थित राहिल्याने सरपंच किशोर देसाई यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव चार विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आला. 

यावेळी सरपंच किशोर देसाई, पंच विराज देसाई व सुरज नाईक हे गैरहजर राहिले, तर उपसरपंच बाबलो भागो खरात, बापू कानो शेळके, श्रद्धा लक्ष्मण बोरकर व जिमी बाळो रेकडो हे उपस्थित होते. काले पंचायत सभागृहात झालेल्या या प्रक्रियेत गट विकास अधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारी म्हणून लुईस डिसिल्वा यांनी कामकाज हाताळले. यावेळी पंचायत सेक्रेटरी दिनकर कोसंबे उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या