सांकवाळ पंचायतीच्या सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

अकरा पैकी नऊ पंचांनी सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला
सांकवाळ पंचायतीच्या सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर
सांकवाळ पंचायतीचे पंच सारपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडताना (Goa) दैनिक गोमन्तक

दाबोळी: सांकवाळ पंचायतीच्या अकरा पैकी नऊ पंचांनी सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव (No-confidence motion) मंजूर केला. गेल्या 5 ऑक्टोबर रोजी साकवाळ पंचायतीच्या 11 पंच सदस्यांपैकी 9 जणांनी सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस मुरगाव गटविकास कार्यालयात दाखल केली होती.

सांकवाळ पंचायतीचे पंच सारपंचाच्या  विरोधात अविश्वास ठराव मांडताना (Goa)
गवाणे येथील एका मिनी पुलाचा कठडा कोसळल्यामुळे वाहतुकीस व्यत्यय

साकवाळ पंचायतीचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्यावर गेल्या आठवड्यात 9 पंच सदस्याने अविश्वास ठराव मुरगाव गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक यांना सादर केला होता. सदर अविश्वास ठरावावर मंगळवारी पंचायत निर्वाचन अधिकारी एल्विस फिगारीयो यांच्यासमोर झालेल्या बैठकीत ठराव 9 - 0 ने संमंत करण्यात आला. पंच तुळशीदास नाईक, नारायण नाईक, गिरीश पिल्ले, कविता कमल, नंदिनी देसाई, गोविंद लमाणी, हरीश कादर, सतीश पडवळकर, उपसरपंच सुकोरीना वालिस बैठकीला उपस्थित होते. तर विद्यमान सरपंच रमाकांत बोरकर, पंच सौ. सुनिता बोरकर बैठकीला गैरहजर राहिल्या.

माजी सरपंच गिरीश पिल्लई म्हणाले की, बोरकर लोकांचे कोणतेही काम करत नव्हते. बोरकर वारंवार फोन करून त्यांना त्रास देत होते.आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे, की जर आम्ही लोकांसाठी काम केले नाही तर ते आम्हाला मतदान करणार नाहीत असे ते म्हणाले. पंच तुळशीदास नाईक म्हणाले की गेल्या एक वर्षापासून पंचायतीत अनेक गोष्टी घडत होत्या, ज्याला आमच्यापैकी कोणीही मान्यता दिली नाही म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा आणि अविश्वास ठराव संमत करण्याची नामुष्की ओढवली असे ते म्हणाले.

सांकवाळ पंचायतीचे पंच सारपंचाच्या  विरोधात अविश्वास ठराव मांडताना (Goa)
आल्मेदा यांच्या विरोधात बोलल्यास...:दीपक नाईक

सांकवाळ पंचायतीच्या माजी सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजविला होता. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोलणे, बेकायदेशीर कामांना पाठिंबा देणे हे लोक सेवा करणाऱ्यांना शोभत नाही.साकवाळचे सरपंच पद भूषविता रमाकांत बोरकर यांनी विविध कामांत भ्रष्टाचार माजवून एकाप्रकारे लोकसेवेच्या पदाचा अपमान केला आहे.

बिर्ला झुआरी येथील साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा कचरा प्रकल्पात सुद्धा त्याने भ्रष्टाचार केला असल्याचे माहिती पंचायत तुळशीदास नाईक यांनी दिली. कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांचा अपमान करून बोरकर यांनी मोठी चूक केली होती. तसेच इतर पंच सदस्यांना सुद्धा त्याने डावलून पंचायतीत गैरप्रकारे कामे केली होती. अशी माहिती पंच तुळशीदास नाही यांनी दिली. त्याने सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेल्या कृत्यांना भविष्यात जाब द्यावा लागेल अशी माहिती साकवाळ पंचायतीचे पंच तथा दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी दिली.

सांकवाळ पंचायतीचे पंच सारपंचाच्या  विरोधात अविश्वास ठराव मांडताना (Goa)
मगोपचे नेते प्रेमानंद नानोस्करांनी आम आदमी पक्षात केला प्रवेेश

दरम्यान साकवाळ पंचायतीचा नवीन सरपंच निवडण्यासाठी लवकरच तारीख निश्चित होणार आहे. पुढील सरपच कोण हे अजून स्पष्ट झाले नसले तरी साकवाळचे माजी सरपंच गिरीश पिल्ले यांना पुन्हा एकदा सरपंच बनण्याचा मान मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत नवीन सरपंच निवडण्यात येणार नाही तोपर्यंत उपसरपंच सुकोरिना वालीस यांच्याकडे ताबा असणार आहे.

Related Stories

No stories found.