‘मांडवीबाबत फुकटचे सल्ले नकोत!’:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, क्षारता ही नैसर्गिकपणे सर्व हंगामात नोंद करावी लागते. आता केंद्राने पथक पाठवले नसते, तर पुढील वर्षाचा पावसाळा संपेपर्यंत वाट पाहावी लागली असती. केंद्र सरकारने तत्काळ विनंती मान्य करून पथक पाठवले.

पणजी: मांडवी नदीच्या पात्रातील पाण्याची क्षारता कधी तपासावी, याचे सल्ले कोणी देण्याची गरज नाही. प्रत्येक हंगामातील क्षारता नोंदवली जाणार आहे. मुळात क्षारता तपासावी, ही मागणी मी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून केली होती. तेव्हापर्यंत कोणाला हा विषय सुचला नव्हता, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हाणला.

ते म्हणाले, क्षारता ही नैसर्गिकपणे सर्व हंगामात नोंद करावी लागते. आता केंद्राने पथक पाठवले नसते, तर पुढील वर्षाचा पावसाळा संपेपर्यंत वाट पाहावी लागली असती. केंद्र सरकारने तत्काळ विनंती मान्य करून पथक पाठवले. ते पथक पुन्हा मार्च - एप्रिलमधील क्षारता मोजण्यासाठी येणार, हे जाहीर केले असतानाही तीच मागणी जाहीररीत्या करून आपण काहीतरी जगावेगळे सूचवत आहोत, असा आव आणण्याचा प्रयत्न होत आहे. आंबेशी, गांजेपर्यंत क्षारता पोहोचते हे मला कोणी सांगण्याची गरज नाही. मी म्हादई परिसरातच राहतो. त्यामुळे या प्रश्‍नाची मला बऱ्यापैकी जाण आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या