गोव्यात ऑलेक्ट्राची इलेक्ट्रिक बस सेवा सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

आता इलेक्ट्रिक बस उत्पादक ऑलेक्ट्राच्या गोव्यातील कदंबा परिवहन महामंडळात 50 बसेस असतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी इलेक्ट्रिक बसला हिरवा झेंडा दाखविला आहे

पणजी: गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. सुट्टयांच्या दिवसात सणासुदिला पर्यटक गोव्याकडे वाटचाल करतात. त्याचबरोबर गोव्यात असणारे समुद्रकिनारे आणि तिथले सी फूड पर्यटकांना आकर्षित करते. अशातच पर्यटक आणि परिवहनाचा विचार करता गोव्यात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी केंद्रिय पर्यावरण, वन व हवामान मंत्री प्रकाश जावडेकर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आता इलेक्ट्रिक बस उत्पादक ऑलेक्ट्राच्या गोव्यातील कदंबा परिवहन महामंडळात 50 बसेस असतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी इलेक्ट्रिक बसला हिरवा झेंडा दाखविला आहे. या बसची लांबी 12 मीटर असून एका ठराविक शुल्कात प्रवासी 250 किमी पर्यंत प्रवास करू शकणार आहे. ही बस वातानुकूलित असून चालकासह 49 जणांच्या बसण्याची व्यवस्था बसमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनसह सुसज्ज आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आणि आपत्कालिन बटन बसविण्यात आले आहे.

मागील अर्थसंकल्पातील किती घोषणांची पूर्ती किती झाली ? कामतांचा सवाल 

"गोव्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे कारण केंद्रीय उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही फेम इंडिया II योजनेंतर्गत राज्यात 30 पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसे आनावरण करत आहोत," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

पर्यटकांचे स्वागत! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय 

“गोव्यात जागतिक स्तरीय इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची संधी दिल्याबद्दल ओलेक्टा कदांबाचा मला अभिमान आहे आणि मी त्यांचा आभारी आहे. आमच्या बसेस आता गोव्यातील समृद्ध पर्यावरणीय संवर्धनास हातभार लावतील. इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टमद्वारे प्रदूषण पातळी कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी ओलेक्टा वचनबद्ध आहेत. आम्हाला खात्री आहे की गोवा राज्यात इतर राज्यांप्रमाणेच आमच्या इलेक्ट्रिक बसची सेवा यशस्वी होईल," असे एमईआयएल (ऑलेक्ट्रा ग्रीनटेक) चे ग्रुप डायरेक्टर केव्ही प्रदीप म्हणाले.

संबंधित बातम्या