Goa Vaccination: गोवा भारतात अव्वल, लसीकरण पोहोचले सात लाखांजवळ

Goa Vaccination: गोवा भारतात अव्वल,  लसीकरण पोहोचले सात लाखांजवळ
Goa vaccination

पणजी : गोवा(Goa) राज्य हे भारतातील(India) लसीकरण(Vaccination) शर्यतीत आघाडीवरचे राज्य आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत किनारपट्टीच्या राज्याने आपल्या 15.9  लाख लोकसंख्येपैकी 37.35% लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कैल राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची संख्या सात लाखाजवळ पोचली असून आज लसीकरणाची संख्या सात लाखाच्या पार जाणार आहे. आज लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 14,959 एवढे लसीकरण झाले. त्यामध्ये 14,562  व्यक्तींनी लसींचा पहिला डोस घेतला, तर 397 व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. राज्यातील सर्व इस्पितळे, आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये तसेच टिका उत्सव लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण  सुरू आहे.  

तिसरी लाट महिनाभरात शक्य
राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या 3 ते 4 आठवड्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य संचालनालय तसेच सरकारने सर्व ती तयारी केली आहे. आवश्‍यक असलेली उपकरणे, इस्पितळात पुरेशी जागा तसेच औषधांचा मुबलक साठा तयार ठेवण्यात आला आहे. ही लाट मुलांना संसर्ग करणारी असेल असे तर्क काढण्यात येत असल्याने मुलांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी ही तयारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com