Goa vaccination: लसीकरणात गोवा देशात अव्वल

Goa vaccination
Goa vaccination

पणजी : गेल्या काही दिवसांत राज्यात(Goa) कोरोनाबाधितांची(Covid-19) संख्या कमी होत आहे. दुसरीकडे, लसीकरणाचा(Vaccination) वेगही वाढला आहे. राज्य छोटे असले तरी गोव्याने(Goa) लसीकरणात अव्वल स्थान पटकाविले आहे. लोकसंख्येच्या मानाने गोव्याने रविवारी इतर राज्यांना मागे टाकले. राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण मोहिम राबविली आहे. त्याचा फायदा होताना दिसत आहे. 

राज्यात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या गोव्यात 11 लाखाच्या आसपास आहे. त्यातील 5 लाख 41 हजार 908 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. ही टक्केवारी 50.73 टक्के होत आहे. 20 जून पर्यंत 7,45,224 एवढे लसीकरण झाले आहे .दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 1,01,656 आहे. रविवारी दिवसभरामध्ये 15,656 नागरिकांनी लस घेतली. मध्ये पहिला डोस घेतल्यांची संख्या 15,264 असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 392 आहे . लसीकरणात देशात गोव्यानंतर सिक्कीम, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, केरळ, गुजरात व दिल्ली यांचा क्रमांक आहे. या सर्वांची टक्केवारी 35 टक्के खाली आहे.

दिवसभरात 6 बळी, 207 नवे रुग्ण
राज्यात काल रविवारी 6 कोरोना बळींची नोंद झाली तसेच 207 नवे रुग्ण आढळून आले. रविवारी 2,442 चाचण्या घेण्यात आल्या. दिवसभरात 406 कोरोना बाधित बरे झाले. राज्यात 3,268 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी ज्या 6 जणांचा मृत्यू झाला त्यातील 3 जण गोमेकॉत, 2 जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात व एकजण उत्तर गोव्यातील खाजगी इस्पितळात मरण पावला.  राज्यात कोरोना बाधित  बरे होण्याची टक्केवारी  96.19 वर पोचली आहे.  

राज्यात कोरोना नियंत्रणात येत असून मे महिन्यात 1481 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसात कोरोना मृत्यूंची संख्या 263 झाली आहे. मे महिन्यात 11,121 बाधित बरे झाले होते. तर जून महिन्यांत 20 दिवसांत 18,002 कोरोना बाधित बरे झाले आहेत. राज्यात एकूण बळींची संख्या 2,990 एवढी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com