राज्यात तुरळक पावसाची शक्यता 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

राज्यात २० नोव्हेंबरपर्यंत वादळवाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. अरबी सागरासह, मालदीव आणि लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेल्या वादळसदृश्य स्थितीचा फायदा म्हणून राज्यात पाऊस पडू शकतो.

पणजी : राज्यात २० नोव्हेंबरपर्यंत वादळवाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. अरबी सागरासह, मालदीव आणि लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेल्या वादळसदृश्य स्थितीचा फायदा म्हणून राज्यात पाऊस पडू शकतो.

दरम्यान मासेमारी करणाऱ्या लोकांनी या कालावधीत समुद्रात न उतरण्यासाठीचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. या कालावधीत समुद्र किनाऱ्यावर ताशी ४० ते ५० किमी प्रति तास वाऱ्याचा वेग असणार आहे शिवाय लाटांची उंचीसुद्धा अधिक असणार आहे, असे वेधशाळेचे म्हणणे आहे. गेल्या चोवीस तासात राज्य कमीत कमी २५.४ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. २१ नोव्हेंबरच्या दरम्यान मात्र राज्यभरात वातावरण कोरड्या स्वरूपाचे असेल.

संबंधित बातम्या