Goa: लसीकरण पूर्ण केलेल्या विक्रेत्यांनाच डिचोलीत माटोळी बाजारात प्राधान्य

पालिकेचा निर्णय, पारंपरिक जागेतच भरणार माटोळी बाजार (Goa)
Goa: लसीकरण पूर्ण केलेल्या विक्रेत्यांनाच डिचोलीत माटोळी बाजारात प्राधान्य
डिचोलीत माटोळी बाजारासाठी जागेची आखणी करताना पालिकेचे कर्मचारी व पोलिस (Goa)Dainik Gomantak

Goa: डिचोलीत (Bicholim Matoli Bazzar) यंदा चतुर्थीचा बाजार भरणार असला, तरी 'कोविड' महामारीच्या धोक्यामुळे (Covide's epidemic threat) बाजारावर कडक निर्बंध येण्याचे संकेत मिळत आहेत. तसा निर्णयही पालिकेने घेतला आहे. पूर्ण लसीकरण (Covide Vaccination) अर्थातच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विक्रेत्यांनाच बाजारात बसण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय सुरक्षेची उपाययोजना म्हणून सार्वजनिक गणपती पूजन स्थळी सीसी टीव्ही कॅमेरे बसावितानाच बाजारात ध्वनीक्षेपकाद्वारे 'कोविड'च्या मार्गदर्शका नियमांबाबत जागृती करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पुंडलिक (कुंदन) फळारी (Mayor Kundan Falari) यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पूर्ण लसीकरण केलेल्या विक्रेत्यांनाच बाजारात बसण्यास मुभा देण्याच्या पालिकेच्या निर्णयाचे डिचोलीतील गणेशभक्त नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले, तरी ग्राहक आणि फिरत्या विक्रेत्यांमुळे सुरक्षेबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चतुर्थी म्हटली, की दरवर्षी बाजारात खरेदीसाठी गर्दी उसळत असते. 'कोविड' च्या सावटातही यंदाही चतुर्थीच्या बाजारात विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने सावध निर्णय घेवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. नगराध्यक्ष श्री. फळारी, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर नगरसेवक दीपा शेणवी शिरगावकर, सुदन गोवेकर, निलेश टोपले आणि अधिकाऱ्यांनी बाजाराची पाहणी करून चतुर्थीच्या बाजार कोणत्या पद्धतीने भरणे शक्य आहे, त्याचा आढावा घेतला.

डिचोलीत माटोळी बाजारासाठी जागेची आखणी करताना पालिकेचे कर्मचारी व  पोलिस (Goa)
Goa Election 2022: मांद्रेत कॉंग्रेसच्या ३ उमेदवारांची तिकिटासाठी चढाओढ

फिरते विक्रेते ग्राहकांबाबत प्रश्न

चतुर्थी बाजार काळात बाहेरील विक्रेते गर्दी करतात. महामारीच्या धोक्यामुळे यंदा पूर्ण लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र असलेल्या विक्रेत्यांनाच बाजारात बसण्यास मुभा देण्यात येणार आहे. डिचोली बाजारातील बहूतेक पारंपरिक विक्रेत्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, फिरते विक्रेते आणि बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या लसीकरणाबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. बाजारात येणाऱ्या सर्वच ग्राहकांनी तसेच फिरत्या विक्रेत्यांनी पूर्ण लसीकरण केलेय, त्याची शाश्वती कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे बाजारात सुरक्षेबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माटोळी बाजार

महामारीमुळे चतुर्थीच्या बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्यावर्षी बाजाराबाहेर बोर्डे वडाजवळ, श्री शांतादुर्गा विद्यालय, हिराबाई झांट्ये सभागृहासमोर मिळून चारठिकाणी 'माटोळी'चा बाजार भरविण्यात आला होता. मुख्य बाजाराबाहेर विविध ठिकाणी माटोळीचा बाजार भरविण्यात आल्याने गेल्यावर्षी गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली होती. माटोळीचे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला होता. मात्र गणेशभक्तांसह विक्रेत्यांच्या हिताचा विचार करून यंदा बाजारातील पुर्वीच्याच जागेत 'माटोळी'चा बाजार भरविण्यात येणार आहे.मार्केट निरीक्षक किर्ती मातोणकर, गजानन परवार, संजय खर्बे आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बाजारात विक्रेत्यांसाठी जागा मापण्याचे काम सुरु आहे.

पार्किंग व्यवस्था

चतुर्थीच्या काळात निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका इमारतीच्या मागच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही जागाही स्वच्छ करण्यात आली आहे. याशिवाय आवरलेडी , छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर आदी मोकळी जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com