Goa: गांधी जयंतीदिनी पर्रात भव्य सायकल रॅलीचे आयोजन

शांती आणी सहकारितेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन
Calangute MLA & Rural Development Minister Michael Lobo with Parra Sarpanch Dilaila Lobo and other Dignitaries at Calangute, Goa
Calangute MLA & Rural Development Minister Michael Lobo with Parra Sarpanch Dilaila Lobo and other Dignitaries at Calangute, GoaDainik Gomantak

महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) जयंती निमित्ताने शांती आणी सहकारिता या गोष्टीचा संदेश देण्याच्या उद्देशाने येत्या दोन ऑक्टोबरला पर्रा (Parra, Goa) येथे बार्देश तालुका मर्यादित भव्य  सायकल रॅलीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले आहे. पर्राच्या सरपंच दिलायला लोबो (Parra Sarpanch Dilaila Lobo) यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत  ही माहिती दिली.

Calangute MLA & Rural Development Minister Michael Lobo with Parra Sarpanch Dilaila Lobo and other Dignitaries at Calangute, Goa
'AAP'ने रोजगार निर्मितीची घोषणा करताच गोवा भाजपात खळबळ

यावेळी कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Calangute MLA & Rural Development Minister Michael Lobo), कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, नागवां -हडफडेचे सरपंच राजेश मोरजकर, काणका वेर्लाच्या सरपंच अमिता कोरगांवकर, शारीरिक शिक्षक नितीन लिंगुडकर,  सावळ , दयानंद हरमलकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, दोन ऑक्टोबरला म्हापसा जवळच्या पर्रा जंक्शनवर  सकाळी सव्वासहा वाजता मंत्री मायकल लोबो यांच्याहस्ते ध्वज फडकावून  या  सायकल रॅलीची सुरुवात होणार आहे. ही रॅली पर्रा - टिटोपासून साळगांव जंक्शन तसेच  कळंगुट डॉल्फिन सर्कल आणी तेथून नागवां सर्कल ते पुन्हां पर्रा - टिटो ( जंक्शन )असा प्रवास करणार असल्याची माहिती यावेळी पर्राच्या सरपंच दिलायला लोबो यांनी दिली.

Calangute MLA & Rural Development Minister Michael Lobo with Parra Sarpanch Dilaila Lobo and other Dignitaries at Calangute, Goa
गोव्यातून बेळगावला जाणारा ट्रक चोर्ला घाटात कलंडला

आयोजित सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी चौदा वर्षावरील युवक-युवती तसेच ऐंशी वर्षापर्यतची शारीरिकद्रुष्ट्या तंदुरुस्त असलेली  कुणीही व्यक्ती सहभागी होऊं शकते, त्यासाठी नाव नोंदणी सुरु झालेली आहे. या  सायकल रॅली दरम्यान, वाटेत जागोजागी रिफ्रेशमेंटची व्यवस्था तसेच प्राथमीक औषधोपचारासहित रुग्णवाहिका पुर्णवेळ सोबतीला राहाणार आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी तसेच नांव नोंदणी करण्यासाठी  24 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आयोजकाकडून टी-शर्ट, टोपी तसेच शेवटी प्रशस्तीपत्र आणी मेडल बहाल करण्यात येणार आहे. दरम्यान,  कळंगुट पंचक्रोशीतील सर्वच्यासर्व पंचायतींच्या पुढाकाराने  विकास आणी प्रगतीचा विडा उचललेल्या 'टुगेदर फॉर बार्देश' या बॅनरखाली, या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी दिली,  तसेच  प्रत्येक जागरूक नागरिकानीं या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन  मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com