गोव्यातील संभाव्य काँग्रेस बंडखोरांवर चिदंबरम यांची करडी नजर

गोव्यात (Goa) काँग्रेस हाच सक्षम पक्ष हे आता काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यानी पटवून दिले पाहिजे असे चिदंबरम यांनी सांगितले.
गोव्यातील संभाव्य काँग्रेस बंडखोरांवर चिदंबरम यांची करडी नजर
Congress CommitteeDainik Gomantak

मडगाव: काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केलेले लुईझींन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी काँग्रेस पक्षाशी प्रतारणा करून तृणमूल पक्षाला जवळ केले त्याचे पडसाद आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत उमटले. आता आणखी कोण बंडखोरी करू पाहत असल्यास आताच त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना गट समितीतून बाहेर काढावे अशी सूचना त्यांनी दिली. फालेरो यांचे काँग्रेस सोडून जाणे पक्षासाठी निश्चितच हानिकारक आहे. त्यामुळे काँग्रेसची मते तृणमूल पक्षात वळण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला हरविण्यासाठी गोव्यात काँग्रेस हाच सक्षम पक्ष हे आता काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यानी पटवून दिले पाहिजे असे चिदंबरम यांनी सांगितले.

Congress Committee
फालेरो ममता बॅनर्जींची भेट घेऊन गोव्याला परतले

चिदंबरम (P. Chidambaram) हे तीन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असून आज ते काणकोण व वेळ्ळी येथील काँग्रेस सक्रिय कार्यकर्त्या बरोबर बैठक होणार असून उद्या ते बाणावलीच्या कार्यकर्त्यांना भेटतील. त्यापूर्वी आज दुपारी त्यांनी मडगावच्या एका हॉटेलात समन्वय समितीची बैठक घेतली.

Related Stories

No stories found.