Latest Goa Politics News: गोव्याच्या काँग्रेसमध्ये लवकरच बदल

Goa Politics News: सर्व काँग्रेस समित्या करणार पुनर्गठित
Goa Politics News |Congress
Goa Politics News |CongressDainik Gomantak

Goa Politics News: गोवा प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या तयारीत असून सर्व समित्या पुनर्गठित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश काँग्रेस समिती, दोन्ही जिल्हा समित्या आणि गट समित्यांचा यात समावेश असणार आहे.

हल्लीच 21 गटाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत, तर येणाऱ्या दिवसांमध्ये इतर 19 गटाध्यक्ष लवकरच नियुक्त केले जाणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत पक्षात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर गोव्यातही समित्यांमध्ये बदल केले जाणार आहेत. यासंदर्भात काम सरू झाले असून संघटना बळकट करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होत आहे.

शुक्रवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत देखील गोवा आणि गोमंतकीयांशी निगडित प्रश्‍न घेऊन लढण्यावर एकमत झाले आहे. परंतु त्यासाठी मजबूत संघटनेची आवश्‍यकता आहे. भारत जोडो यात्रा सुरू असल्याने प्रक्रियेत थोडा विलंब झाला आहे. मात्र, आता आवश्‍यक बदल आणि त्याबद्दल सूचना केंद्रीय पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आले आहेत, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

Goa Politics News |Congress
Girish Chodankar-Amit Patkar: काँग्रेसमध्ये पडद्याआड गटबाजी..!

फुटिरांच्या मतदारसंघात होणार सक्रिय

आठ काँग्रेस आमदार पक्षांतर करून भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील गट समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. यातील दोन शिवोली आणि साळगाव समित्या पुनरर्गठित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नवीन गटाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

शिल्लक सहा गट समित्यांवर देखील लवकरच नवीन गटाध्यक्ष नियुक्‍त केले जाणार आहेत. एकदा संघटनेत बदल झाल्यानंतर पुन्हा फुटीर आमदारांच्या मतदारसंघात पूर्वीप्रमाणे सक्रिय होणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com