Goa News: 2170 कलाकारांना मिळतोय ‘कला सन्मान’

Goa News: नवे 182 अर्ज : राज्य सरकारच्या योजनेद्वारे वृद्धापकाळात सन्मानाने जगण्याचा आनंद
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa News: राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याने पुढाकार घेत ज्येष्ठ गोमंतकीय कलाकारांसाठी कला सन्मान योजना सुरू केलेली आहे. ही योजना अनेक कलावंतांसाठी महत्त्वपूर्ण लाभाची ठरत आहे. या योजनेद्वारे सद्यस्थितीत 2170 ज्येष्ठ कलाकारांना प्रतिमहा 2500 हजार रुपयांप्रमाणे एकूण 54 लाख 25 हजार रूपये वितरीत केले जातात.

कलाकारांना उतारवयात त्यांना आर्थिक चणचण भासू लागते. याकरिता कलाकारांसाठी गोवा शासनाच्या कला व संस्कृती खात्याने कला सन्मान योजना सुरू केलेली आहे. यावर्षी एकूण 182 कलाकारांनी या योजनेखाली अर्ज केले आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी पात्र कालाकारांना जाहिरात देऊन कळविले जाते. आवश्‍यक कागदपत्रे पुरविल्यानंतर त्याची अमंलबजावणी होते. प्रत्येक वर्षी किती अर्ज स्वीकारावेत हे त्या वर्षीच्या उपलब्ध निधीवर अवलंबून असते.

महत्त्वपूर्ण उपक्रम

या योजनेमुळे राज्यातील अनेक कलाकार प्रामुख्याने ग्रामीण कलाकार ज्यांना आर्थिक चणचण भासत होती, ज्यांना उतारवयात कला साधनेद्वारे अर्थाजन करणे अशक्यप्राय आहे. अशा अनेक कलाकारांसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. त्यांच्यासाठी शासनाद्वारे केलेला हा एकप्रकारे कला सन्मानच आहे.

या कलाकारांना योजनेचा लाभ

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोणताही कलाकार ज्याचे वय 60 वर्षे आहे, असे ज्येष्ठ कलाकार अर्ज करू शकतात.

  • कलाकाराने कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात योगदान दिलेले असावे.

  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 48 हजारांपेक्षा अधिक नसावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com