Goa News: साखरपुड्याचा गोडवा वाढवणारा कलाकार

Goa News: संदीप गावस यांचे वेगळेपण : ग्राहकांची आवड, छंद, प्रोफेशननुसार साकारतो लक्षवेधी कलाकृती
Goa News | Art Work
Goa News | Art Work Dainik Gomantak

Goa News: प्रत्येकाने किमान एक तरी कला जोपासणे आवश्‍यक असते. त्यामुळे प्रसिद्ध, सन्मान मिळतोच मात्र त्याहून अधिक कला माणसाला आत्मिक आनंद देते. सर्वसामान्यपणे नाट्य, संगीत, चित्रकला अशा विविध कला आपण जाणतो, मात्र साखरपुड्याला अविस्मरणीय करणारी देखील एखादी कला आहे, असे सांगितल्यास कोणाला खरे वाटणार नाही. परंतु केरी-सत्तरी येथील तरुण संदीप गावस आपल्या कल्पकतेने अनेकांच्या साखरपुड्याचा गोडवा अधिक वाढवत आहे.

या बाबत सांगताना संदीप म्हणाले, मला लहानपणापासूनच कलेची आवड असून नेहमी नवीन आणि वेगळे करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी या कलेचे कोणाकडून प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून ती साकार झाली आहे.

आपल्याकडे पूर्वापार साखरपुड्याची प्रथा चालत आलेली आहे. पूर्वी तोंड गोड करण्यासाठी पुड्यातून साखर आणून ती वाटली जायची आणि साखर पुड्याचा सोहळा संपन्न व्हायचा. मात्र काळ बदलला त्याप्रमाणे सर्वच बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले.

आवडीप्रमाणे निर्मिती

ज्यांचा साखरपुडा आहे त्या व्यक्तींची आवड, छंद, किंवा त्याच्या प्रोफेशननुसार या कलाकृती साकारल्या जातात. जसे की क्रिकेटचा चाहता असेल तर बॅट तयार करायची त्यावर त्यांच्या आवडत्या क्रिक्रेटरचे चित्र लावायचे त्यात साखर भरायची आणि त्या बॅटवर लावलेले बटन दाबले, की त्यातून साखर साखर ओतली जाईल, अशी ही संकल्पना असून सध्या ती लोकप्रिय ठरत आहे.

Goa News | Art Work
Goa News: धारगळ ग्रामसभेत आमदार अनुपस्थित

मित्राच्या साखरपुड्यात प्रयोग :

वेगळ्या प्रकारच्या साखरपुड्याची संकल्पना मनात आली, तेव्हा पहिल्यांदा माझ्या मित्राच्या साखरपुड्यात राबविली. ती अत्यंत लोकप्रिय ठरली. अनेकांना आपल्याही साखरपुड्यात हा साखरपुडा अविस्मरणीय असावा, असे वाटू लागले आणि मागणी वाढू लागली.

गड-किल्ला सफऱीची आवड :

संदीपला या कलेसोबतच चित्रकला, रेखाचित्र, रांगोळी आणि निसर्गाच्या सानिध्यातील वेगवेगळी ठिकाणे, गड-किल्ले सफर करणे आणि संगीताची देखील आवड आहे. इतरांसाठी कष्ट घेण्यास तो नेहमी तत्पर असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com