Goa Latest News: ईडीसीचे चेअरमन सदानंद शेट तानावडे यांचा राजस्थानमध्ये गौरव

Goa Latest News: उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार, चार आस्थापनांचा समावेश
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa Latest News: गोव्यातील औद्योगिक वाढीत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल गोव्याच्या आर्थिक विकास महामंडळ तथा ईडीसीला राजस्थान सरकारच्या राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एसआयडीसी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जोधपूर येथे आयोजित समारंभात गोवा ईडीसीचे चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी राजस्थानच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री शकुंतला रावत यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

जोधपूर येथे नॅशनल कौन्सिल ऑफ स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीओसीडीसी) च्या 8 व्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री शकुंतला रावत यांच्या हस्ते देशाच्या विविध भागातील उद्योजक, संस्था, औद्योगिक आस्थापने यांना त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.

ईडीसीतर्फे पुरस्कार सदानंद शेट तानावडे यांच्यासह इडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले व ईडीसीचे डीजीएम जॉन डिसोझा यांनी स्वीकारला. गोव्यातील अन्य चार आस्थापनांनाही उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले.

हेल्थवे हॉस्पिटल्सतर्फे चेअरमन डॉ. वीरेंद्र गांवकर, डॉ. निलेश तलवडकर आणि डॉ. स्टिवन डायस यांनी पुरस्कार स्वीकारला.

Goa News
Goa News: कुचेली मैदान वाचविण्यासाठी म्हापशासह सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व आस्थापनांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ईडीसी लिमिटेड गेल्या 45 वर्षांपासून राज्यातील औद्योगिक विकासासाठी कार्यरत आहे.

विविध पुरस्कारप्राप्त

आदित्य प्लास्टिक्स (कुंडई) यांना मिळालेला पुरस्कार संदीप नाईक यांनी स्वीकारला. उत्कृष्ट महिला उद्योजक म्हणून मे. ला-कूड एलएलपी(तुये) प्रकल्पाला मिळालेला पुरस्कार रेश्‍मा सुखटणकर यांनी स्वीकारला. आरमाकार होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या सुपरमार्केट युनिटसाठी मिळालेला पुरस्कार प्रकाश परेरा यांच्यावतीने ईडीसी लिमिटेड यांनी स्वीकारला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com