Goa Crime: संशयिताच्या लैंगिकतेला आणखी सहा मुले बळी!

Goa Crime: काही मुलांच्या बाबतीतही अशीच घटना घडली त्यामुळे त्यांच्या पालकांनाही तक्रारी दाखल करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.
Goa Crime News | Goa News
Goa Crime News | Goa News Dainik Gomantak

Goa Crime: डिचोली येथे अल्पवयीन मुलांचे सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाच्या नावाखाली लैंगिक शोषण करणारा संशयित कपिल देऊळकर याच्‍या कृत्‍याला आणखी सहा मुले बळी पडल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. आतापर्यंत तीन गुन्हे संशयितांविरुद्ध दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुन्‍हा न्यायालयात अर्ज केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कपिल हा डिचोली येथील परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण मुलांना देताना त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी कपडे उतरण्यास सांगत असे.

प्रशिक्षणासाठी तंदुरुस्त असणे आवश्‍यक असल्याने तो एक त्याचाच भाग असावा असे या मुलांना वाटायचे. मात्र संशयित अधूनमधून ही वैद्यकीय चाचणी करायला लागल्याने मुलांमध्ये भीती निर्माण झाली होती. संशयित प्रशिक्षण वर्गातून काढून टाकेल याची भीती या मुलांना असल्याने त्यांनी कोठेच वाच्यता केली नाही.

सदर प्रकरण उघडकीस आल्यावर काही मुलांशी एनजीओंनी संवाद साधला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या मुलांच्या पालकांना विश्‍वासात घेऊन आणखी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आणखी काही मुलांच्या बाबतीतही अशीच घटना घडली आहे.

Goa Crime News | Goa News
Goa Crime News: पुण्यातील युवतींची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

त्यामुळे त्यांच्या पालकांनाही तक्रारी दाखल करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचे मानसिक संतुलन सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

त्यामुळे त्याने हा प्रकार मुलांशी जाणूनबुजून केला असल्याचे स्पष्ट होत आहे असे पोलिसांनी सांगितले. सध्‍या संशयिताची पार्श्‍वभूमी तपासण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com