Yuri Alemao: भाजप असंवेदनशील, बेजबाबदार सरकार आहे

Yuri Alemao: लोकांच्या प्रश्‍नांत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
Yuri Alemao |Goa News
Yuri Alemao |Goa NewsDainik Gomantak

Yuri Alemao: भाजप सरकार असंवेदनशील आणि बेजबाबदार असल्यामुळेच राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. जनतेला या सरकारकडून कोणतीही आशा नाही. लोकांच्या विविध मूलभूत प्रश्नांवर आता राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

त्यासाठी आम्ही लवकरच त्यांची भेट घेऊन राज्यातील इतर सर्व महत्त्वाचे विषय त्यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची उपस्थिती होती. युरी आलेमाव म्हणाले की, यावर्षी तूरडाळ, साखर, तांदूळ यारख्या अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व खरेदी आणि वितरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशीची राज्यपालांकडे मागणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला.

त्याशिवाय ओबीसी, एसटी व एससी समजाला वैद्यकीय आणि दंतचिकित्सामधील पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती करणार आहोत.

Yuri Alemao |Goa News
Goa Mining: खाण क्षेत्राला मिळणार चालना!केंद्राने 58 ग्रेड खालील खनिज मालावरील निर्यात कर हटवला

‘त्या’ आमदारांविरोधात लवकरच याचिका

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात याचिका दाखल करणार आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले. लागवडीयोग्य जमिनी वाचवण्यासाठी सांगे येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत पक्ष एकजुटीने उभा राहील. फर्मागुढी येथे हा प्रस्तावित आयआयटी प्रकल्प न्यावा. राज्याचे जेटी धोरण तयार करण्याच्या पर्यटन विभागाच्या कृतीचा कॉंग्रेस विधीमंडळाने निषेध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com