Goa Health News: दहा महिन्यांत 382 डेंग्यू रुग्ण

Goa Health News: नियंत्रणासाठी जनजागृती; डॉ. कल्पना महात्मे
Dengue News| Goa News
Dengue News| Goa News Dainik Gomantak

Goa Health News: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यू नियंत्रणात असला तरी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 382 रुग्णांची पुष्टी झाली आहे. आरोग्य संचालनालयाकडून खबरदारीचे उपाय करूनही डेंग्यूचा संसर्ग काही भागांमध्ये झाला आहे.

डेंग्यू आणखी नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाईल. औद्योगिक वसाहत, जेटी, भाडेपट्टीवरील घरे, बांधकामांची जागा अशा ठिकाणी संचालनालयाचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण भागातील आरोग्य महिला सेविका, पंचायत आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे, अशी माहिती आरोग्य संचालनालयाने ‘गोमन्तक’ला दिली.

2021 मध्ये डेंग्यूचे एकूण 582 रुग्ण सापडले होते, तर 2022 मध्ये दहा महिन्यांत हा आकडा 382 आहे. मागच्या वेळी मुरगाव तालुका डेंग्यूचा हॉटस्पॉट ठरला होता. यंदा बार्देश तालुका डेंग्यूचा हॉटस्पॉट ठरत आहे.

कारण करासवाडा, म्हापसा येथे असलेल्या औद्यागिक वसाहतीत शेजारच्या राज्यातील स्थलांतरित मजूर डेंग्यूबाधित होऊन येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जागृती केली जाणार आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी (गोवा) राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण उपक्रम डॉ. कल्पना महात्मे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी जागृती करण्याची आणि डेंग्यू डास उत्पत्ती स्रोत ओळखण्याची मोहीम वर्षाच्या सुरवातीला केली होती. त्‍यात पंचायत, नगरपालिका आणि इतर संबंधित खात्यांकडून मदत मिळाली आहे.

आपल्या सभोवतीच्या परिसरात डेंग्यू डासांची उत्‍पत्ती होणार नाही यासंबंधी खबरदारीची पावले घेण्यासंदर्भात कार्यशाळेत माहिती देण्यात आली होती. या प्रकारची कार्यशाळा 2023 मध्ये देखील घेतल्या जातील, असे डॉ. महात्मे म्हणाल्या.

Dengue News| Goa News
Goa Petrol Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पण गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले?

यावर्षी ऑक्टोबरमध्ये 74 रुग्ण

"डेंग्यू डास उत्पत्ती स्रोत ओळखण्यासाठी आरोग्य संचालनालयाने विविध प्रकारच्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) ताप आलेला रुग्ण आल्यास, त्याची चाचणी केली जाणार आहे. डेंग्यूबाधित आढळल्यास त्याच्या घरी जाऊन सभोवतीच्या परिसरात स्रोत शोधला जाईल. परिसरात डेंग्यू संसर्ग होणार नाही यासाठी हा एक खबरदारी उपाय आहे."

- डॉ. कल्पना महात्मे, मुख्य वैद्यकीय अधिकारी गोवा, राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण उपक्रम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com