Goa Sky Diving News: गोव्यात लवकरच स्काय डायव्हिंग

Goa Sky Diving News: साहसी पर्यटन : ‘जीटीडीसी’चा उपक्रम, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरुवात
Sky Diving |Goa News
Sky Diving |Goa News Dainik Gomantak

Goa Sky Diving News: गोव्यात उच्च दर्जाचे पर्यटक आकर्षित करण्याचे प्रयत्न गोवा पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) सुरू आहेत. याचाच भाग म्हणून राज्यात विविध प्रकारचे साहसी पर्यटन उपक्रम सुरू करण्यात येत आहेत.

आता लवकरच स्काय डायव्हिंग उपक्रम सुरू केला जाणार असून कायदेशीर प्रक्रियेचे काम पूर्ण केली जात आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत उपक्रम सुरू होण्याची सुरू शक्यता आहे, अशी माहिती जीटीडीसीतर्फे दै. ‘गोमन्तक’ला दिली आहे.

स्काय डायव्हिंग उपक्रम सध्या देशात काही राज्यांमध्ये सुरू आहे, परंतु हा उपक्रम करण्यासाठी देशातील नागरिक हे दुबई आणि विदेशात जात आहेत. गोव्यात हा उपक्रम आल्यास याला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

स्काय डायव्हिंगसाठी काही गोष्टी आवश्‍यक असून त्यात विमान टेक ऑफ आणि नंतर सहल करणाऱ्यांना उतरण्यासाठी ड्रोप झोन आहे. यासाठी किटल, बेतूल येथे गोवा औद्योगिक विकास महामंडळाची (जीआयडीसी) 48 हजार चौरस मीटर जमीन आहे.

ही जमीन उड्डाण क्षेत्रात ही येत नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि जीआयडीसीकडून मान्यता मिळाल्यानंतर पुढील ऑक्टोबरपर्यंत उपक्रम सुरू केला जाऊ शकतो, असे जीटीडीसीचे अधिकारी प्रवीण फळदेसाई यांनी सांगितले. या उपक्रमासाठी गो फॉर्थ एडव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नेमण्यात आले आहे.

उपक्रम सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वांवर असणार असून जीटीडीसीकडून पैसे गुंतवले जाणार नाही. कंपनीला केवळ मार्केटिंगसाठी आणि परवानगी घेण्यास जीटीडीसी सहकार करणार आहे. सध्या नेमण्यात आलेल्या कंपनीकडून नारनौल, हरियाणा येथे स्काय डायव्हिंग उपक्रम चालवला जात आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

स्काय डायव्हिंग म्हणजे काय ?

स्काय डायव्हिंग उपक्रम आपल्या थरारसाठी प्रसिद्ध असून साहसी उपक्रमाची आवड असलेल्यांना हा खूप पसंत आहे. स्काय डाव्हिंगमध्ये विमानातून आकाशात उडी म्हणजे ‘डायव्हिंग ’ केले जाते आणि नंतर जेव्हा जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पॅराशूटद्वारे उतरतात.

Sky Diving |Goa News
Suresh Shanbhogue: केंद्र सरकारने केला खनिज मालावरील निर्यात शुल्क रद्द

उपक्रम करणाऱ्यांना अगोदर प्रशिक्षण दिले जात, त्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. एक ‘डायव्हिंग ’साठी सुमारे 30 ते 40 हजार रुपये शुल्क असल्याने केवळ उच्च दर्जा असलेले,श्रीमंत पर्यटक या उपक्रमाचा लाभ घेतील.

"गोवा पर्यटन विकास महामंडळाने राज्यात साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी मये येथे बंजी जम्पिंग आणि असोल्डे येथे हॉटे एअर बलून सारखे साहसी उपक्रम सुरू केले आहे. राज्यात पर्यटनकांना आकर्षित करण्यासाठी तसेच स्थानिकांना या मार्गातून फायदा व्‍हावा, यासाठी आणखी काही साहसी उपक्रम लवकरच सुरू केले जाईल. "

- ब्रिजेश मणेरकर, व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीसी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com