Margao News: मडगावात ‘मधुमेहासह आनंदी जीवन’ परिषद

Margao News: मधुमेहींसाठी आहार या विषयावर डॉ. पूनम पंजाबी यांचे उपयुक्त व्याख्यान झाले.
Margao News | Goa News
Margao News | Goa NewsDainik Gomantak

Diabetes Day: नवे मार्ग या संस्थेतर्फे आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त दुसऱ्या ‘मधुमेहासह आनंदी जीवन’ परिषदेचे विविध कार्यक्रमांसह आयोजन केले होते. मडगाव येथील मडगाव क्रिकेट क्लबमध्ये आयोजिण्यात आलेल्या या परिषदेत 400 जण सहभागी झाले होते.

या परिषदेत ‘लिव्हिंग हॅपिली वुईथ डाएबिट्‌स’ या डॉ. सेल्सो फर्नांडिस यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मधुमेहींसाठी आहार या विषयावर डॉ. पूनम पंजाबी यांचे उपयुक्त व्याख्यान झाले.

आजच्या परिषदेत मुंबई येथील आहार आणि पोषणविषयक तज्ज्ञ डॉ. पूनम पंजाबी यांचे सादरीकरणासह व्याख्यान अत्यंत उद्‌बोधक ठरले. त्यांनी यावेळी आपल्या वैयक्तिक जीवनातील अनुभवांच्या आधारे केवळ शारीरिक क्रिया आणि आहार शरीरातील साखरेचे प्रमाण कसे कमी केले जाऊ शकते याची माहिती दिली. मधुमेहींनी पायऱ्या चढणे, बैठका काढणे व शारीरिक व्यायाम करणे यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी झालेल्या परिसंवादात लायन्स क्लब, जेसीआय, रोटरी, मुक्ता ऑप्टिशियन्स यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी मधुमेह नियंत्रणाखाली आणण्याच्या उपायांबाबत चर्चा झाली.

Margao News | Goa News
Grains Scam in Goa : क्राईम ब्रँचचा कारवाईचा धडाका सुरुच; फोंड्यासह कुठ्ठाळ्ळीत गोदामांची झडती

गोव्यात 21 क्लब

लिव्हिंग हॅपिली वुईथ डायबिट्‌स क्लबची संकल्पना नवे मार्गचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सेल्सो फर्नांडिस यांची असून या क्लबतर्फे मधुमेहींना मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत केली जाते. अशा पहिल्या क्लबची स्थापना 2021 साली कोलवा येथे केली गेली आणि सध्या गोव्यात असे 21 क्लब आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com