Goa Events: गोवा पॅव्हेलियनला नवी दिल्लीत प्रतिसाद

Goa Events: गोवा पॅव्हेलियनमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत झालेली ही वाढ मुख्यत्वे दोन प्रमुख कारणांमुळे आहे.
Goa Event |Goa News
Goa Event |Goa News Dainik Gomantak

Goa Events: नवी दिल्लीतील 41व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा राज्य पॅव्हेलियनाला मेळावा सुरू झाल्यापासून विशेषत: दिल्ली आणि लगतच्या राज्यांतून अभ्यागतांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या 14 दिवसांच्या कार्यक्रमाची 27 नोव्हेंबर रोजी समाप्ती होणार असून, तोवर अधिक संख्येने लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे.

Goa Event |Goa News
Goa Festival: पणजीत राष्ट्रीय पुस्तक सप्ताह आयोजित

गोवा पॅव्हेलियनमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत झालेली ही वाढ मुख्यत्वे दोन प्रमुख कारणांमुळे आहे. यामध्ये हस्तशिल्प, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभागाशी संलग्न कारागीरांचा सहभाग आहे, जे आयआयटीएफ च्या ''व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल'' या विषयाला आधारून, त्यांच्या उत्पादनांची विक्री करत आहेत.

गोव्यातील दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे, कला संगम, प्रियोळ या संस्थेशी संलग्न कलाकारांचे परिश्रम होय.

‘स्वयंपूर्ण गोवा’अंतर्गत उद्दिष्टे झाली साध्‍य

गोवा पॅव्हेलियनचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘स्वयंपूर्ण गोवा-आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या अनुषंगाने ‘स्वयंपूर्ण गोवा’अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल आणि स्वयंपूर्ण गोवा सुरू करण्यासाठी दृष्टी, गतिशीलता आणि सक्षम नेतृत्व केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com