IFFI 2022: ‘सुवर्ण मयुर’च्या शर्यतीत तीन भारतीय चित्रपट

IFFI 2022: एकूण १५ सिनेमे : इफ्फीच्या मास्टर क्लासमध्ये ए. आर. रेहमान, मणी रत्नम
IFFI 2022  | Goa News
IFFI 2022 | Goa NewsDainik Gomantak

IFFI 2022: रुपेरी पडद्यावरून सामाजिक, भौगोलिक वास्तव जनतेसमोर कलाकृतीच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न होतो, त्याचा नक्कीच गौरव होतो. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुवर्ण मयूर’ देऊन अशाच कलाकृतींना गौरविण्यात येते. यंदा सुवर्ण मयूरचा मान मिळविण्याच्या जगभरातील 15 चित्रपटांच्या यादीत ‘काश्‍मीर फाईल्स’सह आणखी दोन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

20 नोव्हेंबरपासून 53 व्या इफ्फीला सुरवात होणार आहे. ज्युरी मंडळामध्ये इस्राईली लेखक नादव लापिड, अमेरिकेतील चित्रपट निर्माते जिंको गोतो, फ्रान्समधील चित्रपट एडिटर पास्कल चाव्हन्स, फ्रान्स लघुपट निर्माते, फिल्म क्रिटिक आणि पत्रकार जावेर अँग्लो ब्राट्रेन आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा समावेश आहे. काश्‍मीर फाईल्ससह दी स्टोरटेलर (2022) आणि कुरुंगू पेडाल (2022) या तीन भारतीय चित्रपटांचा या स्पर्धेत सहभाग आहे.

IFFI 2022  | Goa News
Mopa Airport News: ‘मोपा’वरील नोकऱ्यांची माहिती पंचायतींना देणार

यंदाचा इफ्फी ‘कान्स’च्या धर्तीवर

यंदाचा ‘इफ्फी’ कान्स चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर दर्जेदार करण्यावर आमचा भर असेल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन यांनी सांगितले.  त्यांनी आज ‘इफ्फी’च्या परिसराला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी इफ्फीचा सर्वांना उत्तम अनुभव कसा घेता येईल याचे योग्य नियोजन करून संकेतस्थळ, ॲप लवकरच सुरू होईल, असे सांगितले.

विख्यात विभुतींचे मार्गदर्शन

इफ्फीमध्ये मास्टर क्लास विभागात देश विदेशातील आघाडीचे संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते किंवा इतर घटकांचा समावेश असतो. यंदा या विभागात प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान, मणी रत्नम, शेखर कपूर, अनुपम खेर, पकंज त्रिपाटी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि प्रसून जोशी यांची उपस्थिती राहणार आहे. महोत्सवासाठी खास येणाऱ्या नवोदितांना या क्लासच्या माध्यमातून अशा विख्यात विभुतींचे मार्गदर्शन लाभत असते.

IFFI 2022  | Goa News
IFFI Preparation | केंद्रीय मंत्री मुरुग्गननी घेतला इफ्फीच्या तयारीचा आढावा | Gomantak TV

स्पर्धेतील इतर 12 चित्रपटांची नावे :

फरफेक्ट नंबर, रेड शूज), ए मायनर , नो एंड (2021), मेडिटेरानेन फेव्हर, व्हेन दी व्हेव्ज आर गॉन, आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स, कोल्ड ॲज मार्बल, द लाईन, सेव्हन डॉग्स (2021), मारिया ः दि ओसियन एंजल (2022) आणि नेझोह (2022).(स्पर्धा विभागातले 15 चित्रपट- वृत्त/13)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com