Goa Crime News: आमिष दाखवून कर्जदारांना लुबाडणाऱ्या दोघाना क्राईम ब्रँचने केले अटक

Goa Crime News: गोव्याबाहेरील कर्जदारांना आपले लक्ष्य बनवत होते.
Goa Crime News | Goa News
Goa Crime News | Goa News Dainik Gomantak

Goa Crime News: कमी व्याजाने कोट्यवधींपर्यंतचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून कर्जदारांना लुबाडणाऱ्या सांगेतील कदम जोडप्याला क्राईम ब्रँचने अटक केली. त्यांना आज न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

या संशयितांनी गोव्याबाहेरील कर्जदारांना आपले लक्ष्य बनवले होते. अजूनही एकही तक्रार त्यांच्याविरुद्ध आलेली नसली तरी पोलिसांनीच स्वतःहून ही तक्रार दाखल केली आहे.

क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अंकुश कदम व पूजा कदम हे जोडपे गोव्यात वास्तव्य करून लोकांना कर्ज देण्याच्या नावाखाली लुबाडणूक करत होते. जे कोणी त्यांच्याशी संपर्क साधत होते त्यांना मोठे कर्ज देण्याचा विश्‍वास देत होते.

काहींना त्यांनी बंगल्यास पैशांच्या नोटा बॅगेमध्ये असलेल्या दाखवल्या होत्या. मात्र त्या बनावट नोटा होत्या. ते पाच टक्क्याने कर्ज आकारत होते त्यातील एक टक्का रक्कम कर्ज देण्यापूर्वीच कर्जदाराकडून रोख स्वरूपात घेत होते.

Goa Crime News | Goa News
Goa Tourism: 'किनाऱ्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करणार'- भिकाजी नाईक

कर्जाची रक्कम त्यांना जमा करण्यास बोलावण्याचे आश्‍वासन देत होते. हे जोडपे गोव्यात घेतलेला बंगला, फ्लॅट वारंवार बदलत होते. मोबाईल्सही बदलत होते. अशा प्रकारे ते फसवत होते. मुख्यमंत्र्यांनी या जोडप्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची चौकशीचे आदेश क्राईम ब्रँचला दिल्यावर हे जोडपे पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com