Goa Government Announcement: प्राण्यांच्या नियंत्रणासाठी ‘ग्लू ट्रॅप’ वापरण्यावर सरकारकडून बंदी

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाने त्याला बंदी घालणारा आदेश परिपत्रकाराद्वारे जारी केला
Goa University | Goa News
Goa University | Goa News Dainik Gomantak

Goa Government: उंदीर तसेच इतर लहान प्राण्यांच्या नियंत्रणासाठी ‘ग्लू ट्रॅप’ वापरणे हे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. या सापळ्यात अडकलेल्या आणि मंद वेदनादायक मृत्यू होणाऱ्या वन्यजीव संरक्षणासाठी गोवा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाने त्याला बंदी घालणारा आदेश परिपत्रकाराद्वारे जारी केला आहे.

यासंदर्भातची मागणी पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडियाने केली होते. त्याची दखल घेत गोवा सरकारने हा आदेश काढला आहे. गोवा सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकात उंदीर व इतर लहान वन्यजीव नियंत्रणासाठी ‘ग्लू ट्रॅप’ तयार करणे, विक्री करणे आणि त्याच्या वापरण्यास मनाई आहे असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या सापळ्यांना प्रतिबंधित करण्याचा सल्ला देणाऱ्या भारतीय प्राणी कल्याण मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी मेघालय, सिक्कीम, तामिळनाडू व तेलंगण या राज्यांमध्ये यापूर्वीच झाली आहे. गोव्याने त्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन पेटाने गोवा सरकारला पाठवलेल्या पत्रात केले होते.

Goa University | Goa News
53rd IFFI 2022: इफ्फी 2022 मध्ये प्रकाशन विभागाने आणला साहित्यिक खजिना

पेटा इंडियाने केलेल्या आवाहनामध्ये प्राण्यांना त्रास देणारे गोंद सापळे वापरणे हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार दंडात्मक गुन्हा आहे. अनेकदा पक्षी, सरपटणारे प्राणी आणि बेडकांसह लक्ष्य नसलेले प्राणी पकडण्यात येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com