53rd IFFI 2022: 'जागतिक आकर्षणाचा सिनेमहोत्सव झाला आहे' - मंत्री एल. मुरुगन

53rd IFFI 2022: सर्वार्थाने जागतिक सिनेमहोत्सव ; इफ्फी जगाला जोडत आहे
 l Murugan  | Goa News
l Murugan | Goa News Dainik Gomantak

53rd IFFI 2022: इफ्फी हा फक्त आता भारताचा सिनेमहोत्सव राहिलेला नसून, गेल्या काही वर्षांत या महोत्सवाला मिळणारा अफाट प्रतिसाद पाहता तो आता सर्वार्थाने जागतिक आकर्षणाचा सिनेमहोत्सव झाला आहे.

यावर्षी मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर इफ्फी नक्कीच जगाला जोडत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केले. इफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर आयोजित समारंभात ते बोलत होते.

उद्घाटन समारंभापूर्वीच यावर्षी शुभारंभाचा ‘अल्मा अ‍ॅण्ड ऑस्कर’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. दुपारी 2.30 वाजता आयनॉक्स येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला रेड कार्पेटचा पहिला मान देण्यात आला.

 l Murugan  | Goa News
IFFI 2022 Opening Ceremony In Goa: आगळ्‍यावेगळ्‍या उद्‌घाटनाचे स्‍वागत

या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक डायटर बर्नर म्हणाले की, अल्मा महलर सुंदर आणि धैर्यवान होती आणि तिने सामाजिक रुढी-परंपरांना आव्हान दिले होते. तर, ऑस्कर कोकोस्का हा एक सिद्धहस्त नाटककार आणि अभिव्यक्तीवादी चित्रकार होता. त्यांच्यातील प्रेमाने दोघांना आत्मनाशाच्या उंबरठ्यावर आणले आणि त्याच्या खुणा कलेच्या इतिहासात मागे सोडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com