Goa Mining: नदीकिनारी खारफुटींची होते कत्तल

Goa Mining: अवैध रेती उत्खनन : ‘सीझेडएमए’कडून गोवा खंडपीठाला अहवाल सादर
sand Mining |Goa News
sand Mining |Goa News Dainik Gomantak

Goa Mining News: अवैध रेती उत्खननप्रकरणी नदीच्या काठावरील परिसरांची जीसीझेडएमएच्या तज्ज्ञ सदस्यांनी तपासणी करून सादर केलेल्या अहवालात बेकायदा पक्की बांधकामे, खारफुटींची कत्तल, मातीचा भराव व काही ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

या बेकायदा कारवायांची खाण खाते व जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी करून कारवाई करण्याची शिफारस जीसीझेडएमएच्या तज्ज्ञ सदस्यांनी गोवा खंडपीठाला सादर केलेल्या 84 पानी अहवालात केली आहे.

बेकायदा रेती उत्खननामुळे नदीच्या पात्रात मिळणाऱ्या खुब्यांचे प्रमाण कमी झाले आहे. स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उत्पन्न झाला आहे. अनेक ठिकाणी नदीच्या काठाच्या बाजूने असलेली जमीन कोसळत आहे ती पुनर्स्थितीत करण्यासाठी जैवविविधता व पर्यावरण खात्याने पावले उचलण्याची गरज आहे.

ना विकास क्षेत्रात कच्चे बांधकाम केलेल्यांना दंड देण्याची गरज आहे ज्यामुळे कोणीही जमीनमालक अशाप्रकारचे बांधकाम करण्यास धाडस करणार नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडे असलेले परवाने सादर करण्यास सांगावे. त्यांच्याकडे जर हे दस्तावेज नसल्यास ही बांधकामे पाडण्यास प्रक्रिया करावी, असा निष्कर्ष काढून शिफारसी करण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध रेती उत्खननप्रकरणी द गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्कतर्फे उच्च न्यायालयात अवमान याचिका सादर केली आहे. गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने ही याचिका सादर केली आहे.

जीसीझेडएमए तज्ज्ञ सदस्यांनी सादर केलेल्या अहवालात मांडवी नदीच्या विविध भागातील काठावर ना विकास क्षेत्र असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले आहे.

कारवाईमुळे आले थोडेसे नियंत्रण

राज्यामध्ये रेती उत्खननाला बंदी असूनही सरकारी यंत्रणा कोणतीच कारवाई करत नसल्याने गोवा खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेऊन खाण अधिकारी तसेच पोलिसांना चांगले धारेवर धरले होते.

त्यामुळे खाण खात्याने परराज्यातून गोव्यात निर्यात करण्यात येणाऱ्या रेतीवाहू ट्रकांना परमिट सक्तीचे केले आहे. या करवाईमुळे राज्यातील बेकायदा रेती उत्खननावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे.

sand Mining |Goa News
Accident In Farmagudi: फार्मगुडी येथे कंटेनरला अपघात! बायपास रोडवरील तीक्ष्ण वळणे म्हणजे मृत्यूचा सापळा

अहवालातील नोंदी

  • वाघुर्मे येथे जमिनीची धूप तसेच त्यामध्ये भराव टाकून जमीन बुजविण्यात आली आहे.

  • सावईवेरे येथे नदीकिनारी रेतीचे मोठ-मोठे ढीग रचून ठेवण्यात आले होते.

  • बेतकी-खांडोळा येथे नदीच्या काठावर बेकायदा पक्के बांधकाम करून रेती व्यवसायातील कामगारांना राहण्याची सोय करण्यात आली होती.

  • कुर्डूवाडा येथे नदीमधील वाळू बाहेर काढून ती रचून ठेवण्यासाठी खारफुटींची कत्तल करून रस्ता तयार करण्यात आला होता, असे अहवालात म्हटले आहे.

  • कोठंबीत जेटीचे काम सुरू आहे. तेथे मातीचा भराव घातला होता. नदीतील काढलेली रेती तेथे ढीग करून ठेवण्यात आली होती.

  • सुर्ला येथे काही झाडे कापून तेथे रेती ठेवण्यासाठी जागा करण्यात आली होती.

  • नावेली येथील खारफुटी कापून रेतीचे ढीग करून ठेवण्यात आले होते.

  • आमोणा येथे मोठ्या प्रमाणात खारफुटी व मातीचा भराव टाकण्यात आला होता.

  • जुवे येथेही रेतीचे ढीग आढळून आले होते, असे सदस्यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com