Goa News: दहा महिन्यांत मिळाले 476 जणांना जीवदान

Goa News: ‘दृष्टी’ची कामगिरी : 16 विदेशींचा समावेश; कळंगुट, बागा, कोलवात सर्वाधिक घटना
Goa News | Lifeguard
Goa News | LifeguardDainik Gomantak

Goa News: ‘दृष्टी’ या किनारपट्टी जीवरक्षक संस्थेच्या जीवरक्षकांनी जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत एकूण 476 बचावकार्ये केली आहेत. किनारपट्टीवर उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हे जीवरक्षक तत्पर असतात. गेल्या 9 महिन्यांत दृष्टी जीवरक्षकांनी 84 लोकांना जीवनदान दिले आहे आणि 28 जणांना फर्स्ट एड किटची सुविधा देण्यात आली.

जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान बेपत्ता मुलांची 91 प्रकरणे समोरे आली. लहान मुले त्यांच्या कुटुंबापासून दूर झाली होती. तर याच मुलांना दृष्टी अलर्ट टीमने पालकांसोबत पुनर्मिलन करून दिले, हरवलेल्या बालकांची सर्व प्रकरणे यशस्वी झाली.

Goa News | Lifeguard
Goa News | धारबांदोडा येथे दोन बंधारे बांधणार - सुभाष | Gomantak Tv

ऑक्टोबर महिन्यात अशा प्रकारच्या सर्वाधिक 24 घटनांची नोंदी झाली. कळंगुट, बागा आणि कोलवा येथे सर्वात जास्त घटना गस्त करताना आढळल्या आहेत. कळंगुट किनारा यावर्षी सर्वाधिक घटनांचा साक्षीदार ठरलेला असून, आतापर्यंत 131 घटनांची नोंदणी झाली आहे.

बागा येथे 85, हरमलमध्ये 28 घटना घडल्या. वागातोर 22, कांदोळीत 19 आणि मोरजी येथे 15 घटनांची नोंद आहे. अश्‍वेमध्ये 12, मिरामार आणि सिकेरी येथे अनुक्रमे 11 घटना तसेच दक्षिण गोव्यात पाळोळे येथे 26 आणि कोलवा किनारी 17 प्रकरणे नोंद आहेत.

जानेवारीत सर्वाधिक

2022 हे वर्ष एक या संस्थेला बरेच व्यस्त राहिले आहे. जानेवारीत (109), मे (63) आणि ऑक्टोबर (53) या महिन्यात सर्वाधिक बचावकार्ये नोंदविण्यात आली. घटनांमध्ये वाचविलेल्यांमध्ये एकूण व्यक्तींपैकी 460 भारतीय नागरिक आहेत. यामध्ये स्थानिक लोकांचाही समावेश आहे. तर 16 विदेशी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com