Pramod Sawant: स्वयंपूर्ण गोव्यासाठी सहकाराला पर्याय नाही; मुख्यमंत्र्यांचं सूतोवाच

गेला आठवडाभर राज्यात सुरू असलेल्या राज्य सहकार सप्ताह 2022 च्या समारोप समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
CM Pramod Sawant | Goa News
CM Pramod Sawant | Goa NewsDainik Gomantak

Pramod Sawant: राज्यातील उत्पादनांना देशभर मागणी मिळावी यासाठी गोवावासीयांनी सरकारी ई मार्केटप्लेस (जॅम) पोर्टलवर नोंदणी करावी. हे उत्पादन मग कोणत्याही प्रकारचे असले तरी हे पोर्टल सर्व भारतीय बाजार स्तरावर उत्पादन घेते. सहकार क्षेत्रात डिजिटलायझेशनची गरज आहे. सहकार क्षेत्रातून स्वयंपूर्ण गोवा शक्य आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. गेला आठवडाभर राज्यात सुरू असलेल्या राज्य सहकार सप्ताह 2022 च्या समारोप समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष श्रीकांत नाईक, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, सहकार सचिव एम. आर. एम. राव, सहकार निबंधक विशांत गावणेकर, संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, विठ्ठल वेर्णेकर व संघाचे सीईओ पी. जी. मांद्रेकर उपस्थित होते.

पुढील वर्षी केलेल्या कामगिरीचा आढावा मागवण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेतकऱ्यांसाठी 2.5 टक्के व्याजाने कर्ज दिले जाते, ते राज्य सहकारी बँकेने घेऊन किमान 4 टक्के दराने ते शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन सुभाष शिरोडकर यांनी केले.

CM Pramod Sawant | Goa News
Accident In Chorla Ghat: अपघातांचे सत्र सुरुच; चोर्ला घाटात मालवाहू ट्रकचा अपघात

सहकारी संस्थांचा गौरव

सहकार क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कार्यकर्त्यांचा तसेच संस्थांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेटर - जयवंत तुकाराम आडपईकर (आडपई), सर्वोत्कृष्ट अध्यक्ष- कृष्णा वासुदेव कुडणेकर, सर्वोत्कृष्ट सचिव - संजय एस. नाईक, सर्वोत्कृष्ट संस्था - सावईवेरे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, दुग्ध सहकारी संस्था - सेरावली दूध उत्पादन सहकारी संस्था, पगारी सहकारी पतसंस्था - गोवा दूध कर्मचारी संघ सहकारी पतसंस्था, कुर्टी, अर्बन सहकारी पंतस्था - डिचोली मर्चंटस् अर्बन को-ऑप पतसंस्था, डिचोली, अर्बन सहकारी बँक, फेडरल व ॲपेक्स संस्था - गोवा राज्य सहकारी बँक, इतर प्रकारच्या सहकारी संस्था - थ्रिफ्ट सहकारी असोसिएशन, फोंडा यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com