Goa: पणजी पदपूल अन् रोप वे प्रकल्पांना 'GCZMA'ची मान्यता

Goa: जीसीझेडएमएच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पर्यटन खात्याशीसंबंधित अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
Goa | Ropeway
Goa | Ropeway Dainik Gomantak

Goa: बहुमजली पार्किंग संकुल व सांता मोनिका जेटीला जोडणारा पदपूल आणि रेईश मागूश रोपवे या दोन प्रकल्पांना गोवा किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) मान्यता दिली आहे. जीसीझेडएमएच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पर्यटन खात्याशीसंबंधित अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.

जीसीझेडएमए आपल्या तज्ज्ञ सदस्याला बहुमजली पार्किंग संकुल आणि सांता मोनिका जेटी जोडणारा पदपुलाच्या जागेचे निरीक्षण करण्याचा आदेश ऑगस्टमध्ये दिला होता. प्रकल्पाचे प्रस्तावक के. गांधी राजू यांनी ज्या ठिकाणी पदपुलाचा पाया घातला जात आहे ती जागा दाखवली.

Goa | Ropeway
Goa Illegal Business: गोव्यात बेकायदेशीर व्यवसाय नकोच- माविन गुदिन्हो

रस्ता ओलांडून जेटीवर जाणाऱ्या पादचाऱ्यांची हालचाल सुलभ करण्याच्या उद्देशाने हा पूल बांधला जात आहे. सध्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्यात या ठिकाणी वाहतुक जास्त असल्याने अपघाताचा धोका आहे.

Goa | Ropeway
Goa Casino: 'GCZMA'ला कॅसिनोंकडून आलेले अर्ज अपूर्णावस्थेत!

पदपुलासाठी दोन्ही बाजूंच्या ढिगाच्या पायाशिवाय जास्त खोदकाम करण्याची आवश्यकता नाही, असे तज्ज्ञ सदस्याने निरीक्षण अहवालात स्पष्ट केले आहे. दरम्यान, दृष्टी क्रूझ फेरीलाही तात्पुरत्या जेटी उभारणीसाठी तसेच आग्वाद तुरुंग संग्राहलय प्रकल्पाचाच्या मागे आणि बोगमाळो समुद्रकिनारपट्टीवर जेटींसाठी मान्यता दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com