Binoy Viswam: सरकारच्या धोरणांचा सर्वधर्मीयांना फटका

Binoy Viswam: भाजप सरकारवर टीकास्त्र
Binoy Viswam |Goa News
Binoy Viswam |Goa NewsDainik Gomantak

Binoy Viswam: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) दोघांनाही लोकांच्या भावनांचा गैरफायदा घ्यायचा आहे. हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असो सर्वांनाच या सरकारच्या धोरणांचा फटका बसला आहे.

लोकांनी खरे प्रश्न विचारावेत, असे भाजपला वाटत नाही आणि त्यामुळेच ते धार्मिक भावनांना भडकावत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि खासदार (राज्यसभा) बिनॉय विश्‍वम यांनी केला.

याप्रसंगी गोव्यातील कम्युनिस्ट नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ॲड. सुहास नाईक यांची उपस्थिती होती. विश्‍वम म्हणाले, इंग्रजांच्या विरोधात संपूर्ण देश स्वातंत्र्य लढा देत असताना आरएसएसनेही सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगून स्वतःला त्यापासून दूर ठेवले. आता हीच संघटना आम्हाला देशभक्तीचे धडे देऊ लागली आहे.

आम्हाला यातून कोणताही धडा नको आहे आणि आरएसएसकडून आम्हाला देशभक्तीचे धडेही नको आहेत. आरएसएसला शिक्षण, आरोग्य किंवा बेरोजगारी या सामान्य माणसांशी संबंधित कोणत्याही प्रश्नात रस नसल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला.

Binoy Viswam |Goa News
Goa Accident Case: वेरणा येथे कदंबा आणि ट्रक यांच्यात अपघात; कदंबा बस चालक किरकोळ जखमी

शुक्रवारी इस्रोकडून खासगी रॉकेट अवकाशात सोडण्यात आले. त्यावर सीपीआय नेते म्हणाले, अंतराळ तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन खासगी एजन्सीकडे सोपवले जात आहे, जे देशासाठी हानिकारक आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसांचे सर्व प्रश्न विसरतो.

"सावरकर हे देशातील सांप्रदायिक फॅसिझमचे जनक आहेत. त्यांनीच गोडसेला गांधी हत्येसाठी प्रेरित केले. आरएसएस म्हणतो, सावरकर देशभक्त होते, पण प्रश्न असा आहे की ज्याने ब्रिटिश सरकारला तीन माफीनामे लिहिले, त्यांना देशभक्त आणि वीर कसे म्हणता येईल?"

- बिनॉय विश्‍वम, खासदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com