Shripad Naik: नियतीने मांडलेल्या या खेळाशी झुंज देण्याची गरज!

Shripad Naik: कोकण रेल्वेच्या वतीने कॅन्सर पीडितांची मोफत प्रवासाची सोय केली जाते.
Shripad Naik |Goa News
Shripad Naik |Goa News Dainik Gomantak

Shripad Naik: जे विधिलिखित आहे ते कुणाला चुकत नाही. परंतु जीवनाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे हे आपल्या हाती आहे. जे अटळ आहे, त्याचा सामना आपल्याला करायचाच आहे. नियतीने मांडलेल्या या खेळाशी निकराने झुंज देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.

पर्वरी येथील विधानसभा भवनाच्या सभागृहात टाटा मेमोरियल कॅन्सर इस्पितळात उपचार घेण्याऱ्या मुलांच्या भेटीनिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात नाईक बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि टाटा मेमोरियल इस्पितळाच्या जनसंपर्क विभागाचे कनिष्ट प्रशासकीय अधिकारी संतोष शेरवडे उपस्थित होते.

गोवा सरकार आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या सहकार्याने गेली 21 वर्षे अशा प्रकारचे दौरे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजिण्यात येत आहेत. कोकण रेल्वेच्या वतीने कॅन्सर पीडितांची व त्यांच्या पालकांची मोफत प्रवासाची सोय केली जाते, तर गोवा सरकारच्या पर्यटन महामंडळातर्फे पीडित आणि त्यांच्या पालकांची मोफत निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते.

देशाच्या विविध भागांतील 27 कॅन्सर पीडित आणि त्यांचे पालक मिळून एकूण 67 जण सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. संतोष शेरवडे या दौऱ्यात गटाचे नेतृत्व करीत आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात गोव्यातील पर्यटनस्थळे त्यांना दाखविली जातील.

Shripad Naik |Goa News
World Toilet Day 2022: सत्तरीतील ग्रामीण भागात शौचालयांचा वापर कमी...

कॅन्सर पीडितांच्या पालकांचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले. ज्याप्रकारे आपल्या पाल्यांची ते सेवा करीत आहेत, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार तुमच्या पाठीशी असताना पालकांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे नाईक म्हणाले.

सकारात्मक दृष्टिकोन, आचरण व सकस आहाराद्वारे अशा रोगांवर मात करणे शक्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढेही अशा दौऱ्यांना सरकारचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com