Goa Latest News: 'नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य शिक्षण ही काळाची गरज' - चंद्रकांत शेट्ये

Goa Latest News: सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या शिक्षण सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
Chandrakant Shetye |Goa News
Chandrakant Shetye |Goa NewsDainik Gomantak

Chandrakant Shetye: नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारही अधिक भर देत आहे, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार आणि इन्फोटेक महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले. सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या शिक्षण सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. शेट्ये यांनी केले.

येथील विद्यावर्धक मंडळ संचलीत श्री शांतादुर्गा विद्यालयात कोडिंग अँड रोबोटिक शिक्षण उपक्रमाखाली सुरु केलेल्या संगणक लॅब आणि ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. शेट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

Chandrakant Shetye |Goa News
Nilkanth Halarnkar on Fisheries: ...तर खाण उद्योगाप्रमाणे 'या' क्षेत्रात होऊ शकते गोव्याची भरभराट

विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, खजिनदार राजेश धोंड, विद्यालयाचे व्यवस्थापक राजाराम चणेकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजित नोडा, मुख्याध्यापिका एडना रॉड्रीग्ज, सहमुख्याध्यापिका यास्मिन शेट्ये, पालक शिक्षक संघाचे भगवान हरमलकर, रोहिदास गाड, भिकाजी गावकर आणि अन्य उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com